You are currently viewing वायंगणतड येथील धोकादायक स्पॉट तातडीने निर्धोक करा : प्रेमानंद देसाई

वायंगणतड येथील धोकादायक स्पॉट तातडीने निर्धोक करा : प्रेमानंद देसाई

*वायंगणतड येथील धोकादायक स्पॉट तातडीने निर्धोक करा : प्रेमानंद देसाई*

अपघातात दोन कुटुंबं झाली उध्वस्त त्याला हा धोकादायक स्पॉट जबाबदार*

दोडामार्ग

दोडामार्ग तिराळी राज्य मार्गावरील वायंगणतड येथील जो बोलेरो पीक अप व दुचाकीत अपघात झाला व दोघांजणांना आपले जीव गमवावे लागले त्याला हा अरुंद असलेला वळणाचा रस्ता कारणीभूत आहे. हा स्पॉट अधिक धोकादायक बनला असून याठीकाणी रुंदीकरण व स्पीड ब्रेकर घालून रस्ता निर्धोक करावा अशी मागणी शिवसेना पक्षाचे सावंतवाडी विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रेमानंद देसाई यांनी उपाभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, याचं मार्गावर आंबेली येथे असाच धोकादायक अपघात स्पॉट होता मात्र त्याचे रुंदीकरण झाले व समोरून येणारे वाहन दृष्टीस पडू लागल्याने अपघात प्रमाण कमी झाले. वायंगणतड येथील सदरचा स्पॉट हा असाच अरुंद आहे काल मद्यपी बोलेरो चालक हा अपघातास पूर्णपणे जबाबदार होताच पण समोरून येणारे वाहन दुचाकी चालकास दिसले असते तर अपघात टळू शकला असता त्यामुळे या ठिकाणी वळण काढून रस्ता सरळ करावा व गतिरोधक टाकावा अशी मागणी प्रेमानंद देसाई यांनी केली आहे

सदर या धोकादायक स्पॉट बाबत श्री. देसाई यांनी बांधकाम विभागाचे लक्ष वेधल्या नंतर बांधकाम विभागाने या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवण्याचे मान्य केले असून लवकरच हा रस्ता वळण काढून सरळ करण्यात येणार आहे. या बाबत उप अभियंता यांच्याशी फोनवर चर्चा झाली असल्याची माहिती प्रेमानंद देसाई यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा