भाजपा दोडामार्ग शहर अध्यक्षपदी राजेश फुलारी*
शहरात संघटना मजबूत करणे व शतप्रतिशत भाजपा करण्यासाठी प्रयत्नशील :राजेश फुलारी*
दोडामार्ग
कसई – दोडामार्ग शहरात भाजपा पक्षाचे पूर्णपणे प्राबल्य वाढवून शतप्रतिशत भाजपामय वातावरण करणे आपले ध्येय असून भाजप पक्षाच्या मजबुती करणासाठी आपण काम करणार असल्याचे राजेश फुलारी यांनी म्हटले आहे, त्यांची आज दोडामार्ग भाजपा शहराध्यक्ष पदी निवड झाली त्यावेळी ते बोलत होते.
तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, दोडामार्ग प्रभारी श्री. काणेकर, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, आनंद तळणकर, माजी नगरसेवक संतोष म्हावळणकर, युवा मोर्चा अध्यक्ष पराशर सावंत, दीपक गवस, नगरसेवक नितीन मणेरीकर, समीर रेडकर, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते, राजेश फुलारी यांचे या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होतं आहे.