रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत विविध उपक्रम…
भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय; फळे, धान्य, बेडशीट वाटप करण्यात येणार…
सावंतवाडी, ता.१८: पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडीत विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय आज येथे झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
यात उपजिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबीर, रुग्णांना फळ वाटप, रुग्णालयाला बेडशीट वाटप तसेच धान्य वाटप इत्यादी विविध समाजपयोगी कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.
सावंतवाडी भाजपा तालुका कार्यालय येथे नियोजनाची बैठक घेण्यात आली. यावेळी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, भाजपा जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव, जिल्हा निमंत्रित सदस्य मनोज नाईक, सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावले, सावंतवाडी शहर सरचिटणीस परीक्षित मांजरेकर, शविनोद सावंत, बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी, आंबोली मंडळ सरचिटणीस, प्रमोद गावडे, युवा मोर्चा बांदा मंडळ अध्यक्ष सिद्देश कांबळी, मळगाव शक्ती केंद्र प्रमुख भास्कर मुननकर , नेमळे बूथ अध्यक्ष सुहास पिकुळकर, प्रवीण वेंगुर्लेकर, सुनील राऊळ तसेच प्रा. गणपत शिरोडकर आदी उपस्थित होते.