*देवगडात कलाकार मेळाव्याचे आयोजन शनिवारी 21 रोजी
देवगड
कलाकारांचे संघटन नसल्यामुळे कोकणातील कलाकारांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते. शासनाच्या कलाकारांसाठी असलेल्या योजना कलाकारांपर्यंत पोहोचत नाही आणि एखादी योजना पोहोचलीच तर त्यासाठी लागणार्या कागदपत्रांसाठी अनेक अडचणी जाणवतात यासाठीच या कलाकार मेळाव्याचे आयोजन *शनिवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वा. खरेदी विक्री संघ, जामसंडे, देवगड* येथे केले गेले आहे. या मेळाव्यात मुख्यत: सर्व क्षेत्रातील कलाकारांची नोंदणी केली जाणार आहे, देवगडला नाट्य परिषदेची शाखा सुरु करण्यासाठीही ही नोंदणी महत्त्वाची ठरणार आहे. सध्या सुरु असलेली शासनाची कलाकार मानधन योजनेचीही सविस्तर चर्चा या मेळाव्यात केली जाणार आहे.
या कलाकार मेळाव्याचे मुख्य संयोजक कलादिग्दर्शक व पिंपरी-चिंचवड नाट्य परिषद व साहित्य परिषद शाखेचे माजी कार्यवाह डाॅ.गणेश उर्फ भाई बांदकर हे आहेत.
कलाकार मानधन योजनेचे मार्गदर्शन करण्यासाठी मानधन समितीचे सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री.संतोष कानडे उपस्थित रहाणार आहेत.
हा कलाकार मेळावा भाजपा किसान मोर्चा व सिंधु ग्राम विकास फाऊंडेशन यांच्या आयोजनातून होणार आहे.
यासाठी प्रमुख अतिथी ॲड.अजित गोगटे असणार आहेत.
नाट्य परिषद शाखेसंबधित मा.श्री.प्रमोद नलावडे आणि मा.श्री.चारुदत्त सोमण तसेच
सिंधु ग्राम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष मा.श्री.सुनिलदत्त करंगुटकर व उपाध्यक्ष डाॅ.कृष्णा बांदकर उपस्थित रहाणार आहेत.
देवगड व परिसरातील कलाकारांनी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी 8080620715 / 8356890422 या नंबरवर संपर्क साधा.