You are currently viewing गणरायाला निरोप

गणरायाला निरोप

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गणरायाला निरोप*

 

… दिला निरोप गणेशा

विनायका परमेशा

लवकर यावे देवा

दिनानाथा हे सर्वेशा

 

 

तुला निरोप देतांना

जीव माझा कासावला

आठवला सारा वेळ

तुझ्यासवे आनंदला

 

 

रोज प्रार्थना आरती

पूजा तुझी करतांना

मिळे सुख अगणित

रूप तुझे बघतांना

 

तुझा निरोप घेतला

तुझ्या ठायी माझी आस्था

उपासना केली खास

काय मनाची अवस्था

 

 

 

नको आता मागे पाहू

लवकर यावे देवा

संधी मिळो मजलागी

करावया तुझी सेवा

 

प्रतिभा पिटके

अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा