You are currently viewing फोंडाघाट मध्ये श्री गणेश विसर्जन उत्साहात संपन्न

फोंडाघाट मध्ये श्री गणेश विसर्जन उत्साहात संपन्न

फोंडाघाट मध्ये श्री गणेश विसर्जन उत्साहात संपन्न

 

फोंडाघाट
फोंडाघाट मध्ये जवळजवळ २०० पेक्षा ज्यादा बाप्पांचे विसर्जन मुळ गणपती घाटावर करण्यात आले. ग्रामपंचायती मार्फत पक्का मंडप आणि लाईटची चोख व्यवस्था केली असलेने सर्व नागरीकांनी सरपंच सौ.आग्रे मंडम आणि सर्व सदस्यांचा अजित नाडकर्णी यांनीअभिनंदन केले. ट्रक , टेंपो,कार,रिक्षा मधुन बाप्पाची मिरवणुक जवळजवळ ५ते६ तास चालु होती.फोंडाघाट पोलीस,आणि होमगार्ड यांनी वाहातुकीचा चोख बंदोबस्त ठेवला होता.देवगड निपाणी हायवेवर प्रचंड वाहातुक असुनही वन वे वाहातुक करुन पोलीस श्री.वंजारे यांनी मोबाईल आणि आपली टु व्हीलर वरुन फिरुन संपुर्ण वाहातुकीवर लक्ष केंद्रीत ठेवुन कोणतीही वाईट प्रसंग घडु दिला नाही. यानिमीत्त अजित नाडकर्णी आज त्यांचा सत्कार करणार आहेत. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या….. या जयघोषात बाप्पाचे साश्रू नयनांनी विसर्जन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा