You are currently viewing ओरोस येथे संविधान मंदिराचे उद्घाटन

ओरोस येथे संविधान मंदिराचे उद्घाटन

ओरोस येथे संविधान मंदिराचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी

शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्यावतीने संविधान मंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण झालेल्या एलफिन्स्टन आयटीआय, मुंबई येथे संपन्न झाला. राज्यातील 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ही एकाचवेळी हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात आला होता. यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोस या संस्थेत जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते संविधान मंदिराचे उद्घाटन  करण्यात आले.

          यावेळी परिवहन विभागाचे विनोद भोपळे, सहायक निरीक्षक  केतन पाटील, प्रभाकर सावंत, सरपंच परशुराम परब, संविधान अभ्यासक निवृत्त शिक्षक अनंत कांबळे, आरोग्य विभाग सहायक उमेश बेहेकर, ग्रामपंचायत सदस्या प्रिया अजगावकर,भक्ती पळसोंबकर कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग सहाय्यक आयुक्त जी.पी. चिमणकर, विभागीय वन अधिकारी सुनिल सावंत, जिल्हा उद्योगकेंद्र अधिकारी श्रीपाद दामले, एन.सी.सी. सुभेदार जसबिर सिंग,एन.सी.सी. हवलदार नरेश इंगवले,  कुमार, राकेश पटेल, देवेंद्र गुरम,  बाळा कानडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

          त्यापूर्वी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ए.एस.मोहारे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा