व्हाईस ऑफ मिडिया दोडामार्ग तालुका अध्यक्षपदी आपा राणे तर सचिवपदी प्रतिक राणे
दोडामार्ग :
व्हाईस ऑफ मिडिया दोडामार्ग तालुका अध्यक्षपदी आपा राणे तर सचिवपदी प्रतिक राणे यांची निवड करण्यात आली. व्हाईस ऑफ मिडिया संघटना भारतासह विदेशातील 41 देशात कार्यरत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक उपक्रम राबवले जात आहे. कुडाळ येथे जिल्हाध्यक्ष परेश राऊत यांनी दोडामार्ग तालुकाध्यक्ष आपा राणे व सचिव प्रतिक राणे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी व्हाईस ऑफ मिडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष परेश राऊत, सचिव संजय पिळणकर, सहसचिव अमित पालव, उपजिल्हाध्यक्ष भूषण सावंत, कार्यकारणी सदस्य प्रथमेश गवस उपस्थित होते.