You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयात कृत्रीम बुद्धिमत्ता (AI) कोर्स सुरू होणार.

श्री पंचम खेमराज महाविद्यालयात कृत्रीम बुद्धिमत्ता (AI) कोर्स सुरू होणार.

श्री पंचम खेमराज महाविद्यालयात कृत्रीम बुद्धिमत्ता (AI)
कोर्स सुरू होणार.

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत श्री . पंचम खेमराज महाविद्यालय , सावंतवाडी येथे संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी डेटा सायन्स आणि आर्टीफीशीयल इंटेलींजन्स सर्टीफीकेट कोर्स सुरू करण्यात येणार आहे.
चालू शैक्षणिक वर्षात जे विद्यार्थी बीए, बीकॉम ,बीएससी अथवा इतर कोणत्याही फील्ड मध्ये शिक्षण घेत आहेत ते विद्यार्थी हा सर्टिफिकेट कोर्स करू शकतात. पुढे येणारे युग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आहे. या कोर्सचा उपयोग भविष्यामध्ये नोकरी व्यवसायामध्ये होणार आहे. सध्याच्या आधुनिक जगात वाढत्या टेक्नाॅलाॅजी ची गरज लक्षात घेता डेटा सायन्स व ए.आय. हा कोर्स भवितव्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वपूर्ण आहे. आजचा तरुण नोकरीच्या शोधात आहे. त्यासाठी सहज नोकरी मिळून देणारा हा कोर्स आहे. भविष्यात या वाढत्या तंत्रज्ञानाला जगभरात मागणी असणार आहे त्यामुळे नोकरीच्या दृष्टीकोनातून तरुणांसाठी हि एक सुवर्ण संधी आहे. या कोर्स मध्ये विद्यार्थ्याला कंपनी मध्ये लागणाऱ्या स्कील्स शिकवल्या जातील.
कोर्स ची फी 200000/- असून फक्त आपल्या कोकणवासियांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स फक्त 10000/- मध्ये दिला जात आहे. संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज
लखमसावंत भोंसले यांच्या प्रयत्नातून हा कोर्स श्री पंचम खेमराज महाविद्यालयात सुरू केला जाणार आहे. सप्टेंबर 2024 पासून हा कोर्स महाविद्यालयामध्ये सुरु होणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी या कोर्ससाठी प्रवेश घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एम भारमल यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा