You are currently viewing २९ रोजी कुडाळ येथे हिंदी भाषा वक्तृत्व स्पर्धा

२९ रोजी कुडाळ येथे हिंदी भाषा वक्तृत्व स्पर्धा

कुडाळ :

२९ सप्टेंबर रोजी कुडाळ येथील रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय (जिल्हा ग्रंथालय) च्यावतीने सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत जिल्हा ग्रंथालय (कुडाळ) येथे कै. सौ. गंगाबाई पां. जोशी हिंदी भाषा वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा तीन गटात होणार आहे.

गट क्र. १-पाचवी ते सातवी (तालुकास्तरीय) विषय : १. मेरी पाठशाला, २. मेरा भारत महान, ३. विज्ञान का वरदान, प्रथम क्रमांक २५१ रु., द्वितीय २०१ रु., तृतीय १०१ रु.

गट क्र. २ आठवी ते दहावी (जिल्हास्तरीय) विषय : १. हिंदी का वैश्विक प्रचार, २. सूचना प्राधोगिकी और हिंदी, ३. इक्कीसवी सदी का भारत, पारितोषिके : प्रथम क्रमांक २५१ रु., द्वितीय २०१ रु., तृतीय १५१ रु.

गट क्र. ३-सर्वांसाठी खुला (जिल्हास्तरीय) विषय : १. राष्ट्र निर्माण में युवकों का योगदान, २. सोशल मीडिया और हिंदी, ३. देश की वर्तमान समस्याए और समाधान, पारितोषिके : प्रथम क्र. ३०१ रु., द्वितीय २५१ रु., तृतीय २०१ रु., उत्तेजनार्थ १०१ रु. अशी आहेत.

विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशी रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे ग्रंथपाल यांच्याकडे २७ सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत द्यावीत. अधिक माहितीसाठी मोबा ९४२३०२६७३५ येथे संपर्क साधावा. जास्तीत-जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष अरविंद शिरसाट व कार्यवाह डॉ. विवेक पाटणकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा