You are currently viewing आयशर टेंपो आणि कदंबा बस मध्ये धामापूर येथे अपघात…

आयशर टेंपो आणि कदंबा बस मध्ये धामापूर येथे अपघात…

आयशर टेंपो आणि कदंबा बस मध्ये धामापूर येथे अपघात…

मालवण

मालवण चौके धामापूर कुडाळ मार्गावर धामापूर नाईक स्टॉप नजीक आज दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास वास्को- मालवण हि कदंबा बस क्र. GA – 03 X – 0260 आणि मालवण हून कुडाळच्या दिशेने जाणारा आयशर टेंपो (क्रमांक MH- 07 X – 1936) यांच्यामध्ये समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले सुदैवाने या अपघातात कोणाला दुखापत झाली नाही

यासंबंधीचे अधिक वृत्त असे की, वास्को पणजी येथून सकाळी सुटलेली वास्को- मालवण हि कदंबा बस आज दुपारी चौके धामापूर कुडाळ मार्गावरील धामापूर येथील एका धोकादायक वळणावर आली असता मालवण येथे सिमेंट वाहतूक करून माघारी परतत असणारा टेंपो यांच्यामध्ये जोरदार टक्कर झाली यामध्ये कदंबा बसची समोरील काच फुटली आणि दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने दोन्ही वाहनांचे चालक व बसमधील प्रवासी यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
वळणाचा अंदाज दोन्ही गाड्यांच्या वाहन चालकांना न आल्याने हा अपघात झाला असल्याची चर्चा सुरू होती यावेळी काळसे पोलीस पाटील विनायक प्रभु यांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताची पाहणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा