You are currently viewing १८ सप्टेंबर रोजी आंबोली येथे आरोग्य शिबिराचे आयोजन..

१८ सप्टेंबर रोजी आंबोली येथे आरोग्य शिबिराचे आयोजन..

नागरिकांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा – सरपंच सौ.सावित्री पालेकर

 

सावंतवाडी :

आंबोली ग्रामपंचायत मध्ये बुधवारी दिनांक १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० पर्यंत मोफत सामुदायिक आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी रक्त दाब, मधुमेह, ECG, आवश्यक वाटल्यास प्रयोग शाळेला पाठविण्याकरिता रक्त व लघवी चे नमुने जमा करणे, व इतर आजार व रोग निदान करणे तसेच पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करणे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची माहिती देणे, आभा कार्ड काढण्यासाठी सहकार्य करणे इत्यादी बाबत मोफत सहकार्य व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या शिबिरात राणी जानकीबाई साहेब वैध्यकीय संस्थेचे व आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर उपचार व मार्गदर्शन करणार आहेत. त्याच सोबत वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी व सामुदायिक आरोग्य शिबीर योजना समन्वयक उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरात आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, तरुण मंडळ कार्यकर्ते, महिला बचत गट, सामाजिक कार्यकर्ते, आपत्ती व्यवस्थापन कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त लोकांना उपस्थित राहण्यासाठी प्रेरित करावे, जेणे करून गरजूंना आरोग्य विषयक उपचार व शासकीय आरोग्य योजनाची माहिती मिळण्यासाठी मोलाचे सहकार्य होईल, असे आवाहन
आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा