You are currently viewing वैभववाडी बसस्थानकातील प्रलंबित प्रश्न मार्गी…

वैभववाडी बसस्थानकातील प्रलंबित प्रश्न मार्गी…

वैभववाडी बसस्थानकातील प्रलंबित प्रश्न मार्गी – आमदार नितेश राणे

वैभववाडी
वैभववाडी बसस्थानकातील सर्व प्रलंबित विषय मार्गी लागले आहेत. काही दिवसापूर्वी जनतेला दिलेला शब्द आम्ही पूर्ण केला आहे. बसस्थानकाचा चेहरा मोहरा बदलला असून आज सुसज्ज बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी तयार झाले आहे. या संपूर्ण कामाचे श्रेय हे आमच्या राज्य शासनाचे आहे. जनतेने देखील महायुतीच्या सरकारवर विश्वास ठेवून या पुढील काळात देखील आम्हाला पाठबळ द्यावे असे आवाहन कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांनी केले.
वैभववाडी बसस्थानक नूतनीकरण कामाचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, नासीर काझी, जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, प्राची तावडे, नेहा माईणकर, संजय सावंत, बंड्या मांजरेकर, देवानंद पालांडे, अतुल सरवटे, रोहन रावराणे, रितेश सुतार, प्रकाश पाटील, शिवाजी राणे, रमेश शेळके, उदय पांचाळ, वाहतूक नियंत्रक भागोजी गुरखे व पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माहे ऑगस्ट मध्ये भाजपा पदाधिकारी व संबंधित खात्याचे अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत बसस्थानकातील प्रलंबित विषयाबाबत चर्चा झाली. यावेळी जिल्हा विभाग नियंत्रक श्री पाटील व अधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला होता. मंजूर असलेले काँक्रिटीकरणाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे. बसस्थानकात प्रवाशांना बैठक व्यवस्था करण्यात यावी. बसस्थानकात बैठक व्यवस्था वाढवण्यात यावी. दोन वाहतूक नियंत्रकांची नियुक्ती करण्यात यावी. वैभववाडी – मुंबई गाडी सुरू करण्यात यावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या. या सर्व मागण्या व प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागले आहे. नगराध्यक्षा नेहा माईणकर यांच्या माध्यमातून आणखी एक बसण्यासाठी शेड या ठिकाणी लवकरच उभी राहत आहे. तसेच लोकल गाड्याचे देखील नियोजन लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. यावेळी उपस्थित प्रवाशांबरोबर आमदार नितेश राणे यांनी संवाद साधला.

प्रतिक्रिया व्यक्त करा