You are currently viewing ईद ए मिलाद निमीत्त सावंतवाडी शहरात आयोजित रॅलीला मुस्लिम बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद…!

ईद ए मिलाद निमीत्त सावंतवाडी शहरात आयोजित रॅलीला मुस्लिम बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद…!

ईद ए मिलाद निमीत्त सावंतवाडी शहरात आयोजित रॅलीला मुस्लिम बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद…!

मंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती: ईदच्या दिल्या शुभेच्छा..

सावंतवाडी:

इस्लाम धर्मात ईद मिलाद-उन-नबी हा सण पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. ईद ए मिलाद निमीत्त सावंतवाडी शहरात रॅलीच आयोजन मुस्लिम बांधवांकडून करण्यात आले होते. यानिमित्ताने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मशिदमध्ये उपस्थित राहत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

शहरात ईद ए मिलाद निमीत्त रॅली काढण्यात आली. मुस्लिम बांधवांकडून घर, मशिदींमध्ये कुराण वाचले गेले. या दिवशी गरिबांना दानही केले जाते. सावंतवाडी हा सण मुस्लिम बांधवांकडून साजरा करण्यात आला. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मशिदमध्ये उपस्थित राहत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा