You are currently viewing आंबोली घाटात कर्नाटक परिवहनच्या बसला अपघात

आंबोली घाटात कर्नाटक परिवहनच्या बसला अपघात

आंबोली घाटात कर्नाटक परिवहनच्या बसला अपघात.

सावंतवाडी

आंबोली घाटात कुंभेश्वर नजीकच्या धोकादायक ठिकाणी आज कर्नाटक परिवहनची बस समोरील वाहनाला बाजू देताना रस्त्याच्या बाजूला कलंडली. निपाणी येथील डॉक्टर्स असोसिएशनचे सर्व सदस्य व पदाधिकारी गोवा येथे पर्यटन करण्यासाठी गेले होते. त्यांच्या परतीच्या प्रवासात हा अपघात संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. घटनास्थळी आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी दीपक शिंदे व मनीष शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा