You are currently viewing भोसले नॉलेज सिटी येथे ‘अभियंता दिन’ उत्साहात साजरा

भोसले नॉलेज सिटी येथे ‘अभियंता दिन’ उत्साहात साजरा

सावंतवाडी :

भोसले नॉलेज सिटीमधील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘इंजिनियर्स डे’ अर्थात ‘अभियंता दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे हस्ते दीपप्रज्वलन करून व उपप्राचार्य गजानन भोसले यांच्या हस्ते डॉ.एम.विश्वेश्वरैय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

‘फादर ऑफ इंजिनिअरिंग’ म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशात अभियंता दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्योत्तर काळात देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये डॉ. विश्वेश्वरैय्या यांची मोलाचे योगदान होते.

विद्यार्थ्यांना डॉ. विश्वेश्वरैय्या यांचे कार्य समजावे तसेच अभियंता म्हणून सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी, यासाठी भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये दरवर्षी अभियंता दिन साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाला डिग्री व डिप्लोमा विभागाचे सर्व विभागप्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजच्या सिव्हील विभागाच्या वतीने करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा