सिंधुदुर्ग :
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यामार्फत दिनांक. १३ व १४ सप्टेंबर २०२४ रोजी स्पेशल बस तपासणी मोहीम राबवण्यात आली. या तपासणीमध्ये एकूण २१२ बसेस वर कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई मध्ये फिटनेस, इन्शुरन्स, पीयूसी, अब्स्ट्रक्शन टू एमर्जेंसी एक्झिट, टुरिस्ट परमिट, स्पेशल परमिट, रिफ्लेक्टर व इतर इ-चलन केसेस देण्यात आले.
अतिरिक्त भाडे आकारणी केलेल्या बसेस वरती सुद्धा कारवाई करण्यात आली. तसेच चालकांचे ब्रीद अनालायझर द्वारे ड्रंक अँड ड्रायव्हिंगची तपासणी करण्यात आली.
या तपासणी मोहिमेमध्ये मो.वा.नि. श्री. संदीप भोसले साहेब व स.मो.वा.नि. श्री. तेली, श्री. पोवार, श्री. मातोंडकर, श्री. हिले साहेब उपस्थित होते. तसेच लघु वायुवेग पथकाचे वाहन चालक श्री. केरकर, श्री स्वामी व महसूल पथकाचे चालक श्री राणे उपस्थित होते.