*उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस विशेष वैद्यकीय कक्षाद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ” विनामूल्य सामुदायिक आरोग्य शिबीर “*
*प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष तथा मुख्यालय प्रभारी सिंधुदुर्ग*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात १८ सप्टेंबर ला आंबोली व गेळे गावातुन विनामूल्य सामुदायिक आरोग्य शिबीराचा शुभारंभ*
*भाजपा वैद्यकीय आघाडी शिबीर समन्वयकाची भुमिका बजावणार — डाॅ.रामचंद्र चव्हाण , जिल्हा संयोजक – भाजपा वैद्यकीय आघाडी , सिंधुदुर्ग.*
सामाजिक दृष्ट्या मागास, आर्थिक दुर्बल घटक, सार्वजनिक आरोग्याबाबत दुर्लक्षित तसेच सर्वकष आरोग्य सेवा – सुविधांपासून उपेक्षित घटकांपर्यंत लोकाभिमुख योजना/जनकल्याणकारी योजना पोहोचल्या नाहीत. त्यांच्या पर्यंत विकास पर्वाची गंगा पोहोचावी या उद्देशाने समुदाय आरोग्य शिबीर मध्यवर्ती केंद्रस्थानी असणार आहे. राबवलेल्या शिबिरा मधून सर्वकष आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सामुदायिक आरोग्य शिबिरांचे नियोजन केले जात आहे.
सार्वजनिक आरोग्य संबंधी व्यापकतेने जनजागरूकता निर्माण करून आरोग्याच्या गरजांच्या पूर्ततेकरिता शासना द्वारे विकासाभिमुख योजना व आरोग्य कार्यक्रमातून लाभ मिळावा, सजगता निर्माण होईल या उद्देशाने दोन महिन्यात सर्व तालुक्यातून शिबिरांचे नियोजन केले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून सक्षमपणे नियोजन करून आरोग्य योजना तळागाळतील जनतेकडे पोहोचवण्याकरिता जिल्हास्तरीय कमिटी गठित केली आहे.
यामध्ये धर्मादाय रुग्णालय निरीक्षक प्रतिनिधी – श्री महेश ठसाळे , जिल्हा आरोग्य अधिकारी – डॉ सई रुपेश धुरी ,
वैद्यकीय सामाजिक अधिकारी – श्री सुनील कुंडगिर , महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जिल्हा प्रतिनिधी – डॉ प्रवीण भोसले , महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांचे प्रतिनिधी – डॉ पूजा कर्पे , HLL लॅब – श्री प्रशांत जाधव , स्टेमी (ECG) – श्री केतन कदम ,
निरामय सहाय्यंती प्रतिनिधी – श्री खोत, शिबीर नोडल अधिकारी – डॉ सौरभ पाटील
यांच्या नियोजनातून दोन महिन्यांत जिल्हाभर आरोग्य योजना शिबिरांच्या माध्यमांतून घरा – घरात पोचतील.त्याचा लाभ वंचित घटकांना मिळेल. याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी , सामाजिक कार्यकर्ते,तरुण मंडळ,महिला बचत गट,आरोग्य सेविका, सामाजिक आरोग्य कार्यकर्ते यांच्या एकत्रित प्रयत्नातून ही सामाजिक आरोग्य योजनेची अंमलबजावणी केली जात आहे.
समाजातील नागरिकांना आपल्या गावात,तालुका,जिल्हा जवळपास मोफत शासनाच्या योजना कुठे,कशा मिळतील याचे मार्गदर्शन तसेच आरोग्य सुविधांची कटीबद्धता कशी राबवली जाते याची माहितीही पुरवली जाणार आहे.
भारताच्या खंबीर नेतृत्वाला महाराष्ट्र राज्य कडून ही विविध आरोग्य योजनेची चळवळीची जनजागृतीची सजगता या माध्यमातून करण्यात येत आहे. याचा फायदा जनतेने करून घ्यावा असे आवाहन विनामूल्य सामुदायिक आरोग्य शिबीर जिल्हा निहाय कमिटी मार्फत करण्यात येत आहे सदर शिबीर आपल्या भागात असेल याचा फायदा घ्यावा
याकरिता आमदार श्री. नीतेशजी राणे, जिल्ह्याध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रसन्ना देसाई तसेच भारतीय जनता पार्टी संपूर्ण जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे या शिबिरा दरम्यान व जनजागृतीकरिता मोलाचे सहकार्य मिळत आहे.