You are currently viewing लहान मुलांसाठी उद्या मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन 

लहान मुलांसाठी उद्या मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन 

लहान मुलांसाठी उद्या मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

मालवण

रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी डॉ सिद्धू सकपाळ हार्मोनि मेडिकेअर त्रिंबक टेम्ब बाजार येथे दुपारी 2 ते 5 या वेळेत लहान मुलांकरिता मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात बालरोगतज्ञ् येऊन मुलांची तपासणी करणार आहेत.तसेच या शिबिरात लहान मुलांचे *आयुषमान कार्ड*, *महात्मा फुले योजना* यांची नोंदणी करून घेतली जाणार आहे व त्याविषयी माहिती दिली जाणार आहे.

उपस्थित पालकांची तपासणी करून आवश्यक असल्यास मोफत *कार्डीओग्राम* काढून दिला जाणार आहे.

तरी सर्व ग्रामस्थानी व त्यांच्या लहान बालकांनी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन डॉ सिद्धू सकपाळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा