*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मंगलमुर्ती मोरया*
आले गणपती भूवरी
मिरवू त्यांना पालखीवरी
सोबतीला मुषकाची स्वारी
करू या स्वागताची तयारी
संगीत वाजवून जयघोष करू या
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया //१//
गुलाल उधळून पुष्प दुर्वा वाहू या
धूपदिप लावून करू पुजा अर्चना
वंदन करून निरांजन ओवाळू
आरती म्हणून करू प्रार्थना
संगीत वाजवून जयघोष करू या
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया //२//
चौसष्ट कलांचा अधिपती
बाप्पा तुझी सुंदर मूर्ती
गणांचा नायक गणपती
विश्वात आहे तुझी किर्ती
संगीत वाजवून जयघोष करू या
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया //३//
गणेश चतुर्थीला बाप्पा आला
दहा दिवस मुक्कामाला
नाचूगाऊ उत्सव साजरा करू
बाप्पाला देऊ निरोप चतुर्दशीला
संगीत वाजवून जयघोष करू या
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया //४//
भक्ताच्या हाकेला धाऊन या
संकटं निवारूण वरदहस्त असू द्या
निरोप बाप्पाला देताना म्हणू या
पुढच्या वर्षी लवकर या
संगीत वाजवून जयघोष करू या
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया //५//
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.