*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*काजवा…* (अष्टाक्षरी रचना)
कसा काजव्यांचा जथा
लुकलुके झाडावरी…
भासे स्वर्गातून राती
पऱ्या उतरल्या धरी…।। १ ।।
लुकलुक ती पाहून
आनंदले तनमन…
भरे जशी ओठामंदी
स्वयंप्रकाशाचे गान…।। २ ।।
किर्र दाटल्या अंधारी
झाली चांदणीशी रात…
झाड-फांद्यातून जशी
झुले दीपांची वरात…।। ३ ।।
फिटे डोळ्यांचे पारणे
रम्य दृश्य ते पाहून…
कशी निसर्गाची लीला
मन गेले भारावून…।। ४ ।।
परी इवलासा जीव
कृमि एक निशाचर…
सखा निशेचा काजवा
बने प्रकाशाचा यार…।। ५ ।।
✍️शशांक दिनकरराव देशमुख©®
चांदुरबाजार, जि. अमरावती
(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४
मो. क्र. ९९२३५३६३२५