*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री स्मिता रेखडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सुखकर्ता दुखहर्ता*
प्रथम तूज वंदितो शिवगौरी नदंना
भक्तीभाव पूजेने अर्पितो सुमना
प्रणम्य शिरसा देवं ही तव वंदना
वदता स्तवन नेई पूर्णत्वास प्रार्थना ||१||
रिध्दिसिध्दी सह सिहांसनी विराजितो
भाळी मुकुट,हार कंठी तव शोभवितो
शम्मीपत्र,दूर्वा मस्तकी धारण करितो
अविरत कृपा नेत्रांतुनी भक्तांवर वर्षितो ||२||
चौसष्ट कलांचा अधिपती गणनायक
घेता दर्शन भक्तांची मनःकामना पूर्ती
रुप तव मनोहर व्यासांचा तू लेखनिक
गणेश चतुर्थीस विराजे त्रिभूवन किर्ती ||३||
माझा बाप्पा लाडाचा अग्रपूजेचा मान
ओंकार विश्वरुप आभूषणे अलंकारिता
नटली धरा प्रसन्नतेने तव होता आगमन
आरतीतुन शुभनाद लक्षदिप उजळीता ||४||
ताता थिमकत नाचे गिरीजाकुमार
पुत्र शुभ लाभ मांगल्याने सजती
सुखकर्ता दूखहर्ता सगुण साकार
कृपादृष्टीतुन चैतन्य लहरी वर्षिती ||५||
सौ. स्मिता श्रीकांत रेखडे.नागपूर