नेर्ले-तिरवडे विद्यालयात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित..*
वैभववाडी
तालुक्यातील नेर्ले-तिरवडे येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. नेर्ले तिरवडे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे (मुंबई) अध्यक्ष योगेश इंदुलकर यांच्या माध्यमातून विद्यालय व परिसरात आठ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. बदलापूर अत्याचार घटनेच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे. याबाबत पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नेर्ले, तिरवडे तर्फ सौंदळ, जांभवडे परिसर तसेच लगतच्या राजापूर तालुक्यातील विद्यार्थी या विद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेत आहेत. बदलापूरच्या घटनेनंतर राज्य सरकारने शैक्षणिक संकुलात सीसीटीव्ही यंत्रणा बंधनकारक केली आहे. दरम्यान नेर्ले तिरवडे
पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे नुतन अध्यक्ष योगेश इंदुलकर यांनी स्वखर्चाने आठ कॅमेऱ्यांसह संपूर्ण सीसीटीव्ही यंत्रणा विद्यालयात बसविली आहे. याचे उद्घाटन नेर्लेच्या सरपंच निलांबरी पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष योगेश इंदुलकर तसेच संस्थेचे ज्येष्ठ पदाधिकारी शिवाजी (अण्णा) पाटील, मांगवलीचे सरपंच शिवाजी नाटेकर, मुख्याध्यापक, जयदीप सुतार, रेगन इंदुलकर, संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. संस्थाध्यक्ष योगेश इंदुलकर यांनी विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने उपलब्ध करुन दिली. त्याबद्दल विद्यालय प्रशासन व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले.