*प्रशासकीय अधिकारी होण्याच्या स्वप्नांना ‘एमआयटी एडीटी’चे पंख*
*डॉ.सुजित धर्मपात्रे: स्पर्धा परिक्षांची तयारी करा पदवी व पदव्युत्तर शिक्षणामध्येच*
*पुणे*
सध्याच्या युगात केंद्रीय लोकसेवा आयोग(युपीएससी) किंवा राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांसारख्या स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करणे, म्हणजे मायाजाळात फसण्यासारखे समजले जाते. बऱ्याचदा प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्पप्न उराशी बाळगुण, दरवर्षी लाखो विद्यार्थी कुठल्याही बॅकअप प्लॅनशिवाय स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करतात. त्यात, पदवीपासूनच स्पर्धापरिक्षांच्या योग्य मार्गदर्शनाचा अभाव, अनेक प्रयत्नांनंतरही आलेले अपयश, वाढते वय या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास होतो. ही समस्या ओळखूनच विद्यार्थ्यांच्या प्रशासकीय अधिकारी होणाच्या स्पप्नांना यशस्वीतेचे पंख लावण्याचा संकल्प एमआयटी एडीटी सारख्या अग्रगण्य विद्यापीठाने केला आहे, असे मत , एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे (एसआयसीएस) संचालक डॉ. सुजित धर्मपात्रे यांनी व्यक्त केले.
ते येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. डॉ.धर्मपात्रे पुढे म्हणाले, सनदी सेवा परिक्षांसाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात. त्यासाठी पदवीनंतर ते दिल्ली अथवा अन्य शहारांत लाखोंचा खर्च करून क्लासेस करतात. परंतू, योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्यातील खूपच कमी विद्यार्थ्यांच्या हाती यश लागते. परंतू, बाकीच्या विद्यार्थांचे पुढे काय होते, याचा विचार आपण कधी करतो का? अशाच विद्यार्थ्यांना स्पर्धापरिक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शन व त्याचवेळी त्यांच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगिण विकास करणारा अभ्यासक्रम उपलब्ध करूण देण्यासाठीच, एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाँलाँजी विद्यापीठामध्ये “स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस”ची स्थापना करण्यात आली. बारावीनंतर युपीएससी व राज्यसेवा परिक्षांसह अन्य सरकारी सेवांचा अभ्यास करू पाहाणाऱ्या विद्यार्थ्यांना तज्ञांच्या मार्गदर्शनासह बी.ए. एडमिनिस्ट्रेशन या पदवी आणि आणि एम.ए. पब्लिक एडमिनिस्ट्रेशन या पद्युत्तर अभ्यासक्रमाद्वारे शिक्षण देणारी एमआयटी एसआयसीएस ही भारतातील एकमेव अग्रगण्य संस्था आहे.
हा अभ्याक्रम तयार करण्यामागे युपीएसससीचे माजी चेअरमन डॉ.डी.पी. अग्रवाल, तेलंगणाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक महेश भागवत, नाबार्डचे माजी चेअरमन डॉ. एम.एल. सुखदेवे व अनेक तज्ञांचे योगदान आहे. या त्रिस्तरीय स्पर्धा परिक्षेमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण होण्याकरीता अभ्यासासोबतच त्यांच्या आवडी-निवडी ओळखून कौशल्याधिष्ठीत प्रशिक्षण देणाऱ्या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे.
हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण निवासी असून यात मर्यादित विद्यार्थीसंख्या ठेवून गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक विकासासाठी “एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस” सदैव कार्यरत आहे. यासोबतच पदवीनंतर विद्यापीठांमध्ये एमबीए, लॉ, डिझाइन इत्यादी असे पदव्युत्तर अभ्यासक्रमही शिकता येणार आहेत. या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमुळे दुर्दैवाने जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होणार नाहीत, त्यांना इतर खासगी क्षेत्रांमध्ये नोकरीची संधी प्राप्त होईल. तरी, अधिक माहितीसाठी www.mitsics.edu.in या संकेतस्थळावर अथवा, 9607580042/52 या क्रमांकावर संपर्क साधावा.
चौकट
*सुसज्ज कॅम्पस व तज्ञांचे मार्गदर्शन*
एमआयटी एडीटी विद्यापीठाचा कॅम्पस हा १२५+ एकरमध्ये पसरलेला असून तो, जागतिक दर्जाच्या विविध क्रीडा तसेच अन्य सोई सुविधांनी सुसज्ज असा आहे. यासह, या कोर्स शिकविण्यासाठी युपीएससीसारख्या स्पर्धा परिक्षांचा दांडगा अनुभव असणारे, तज्ञ मार्गदर्शक उपलब्ध आहेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाची उत्तम संधी आहे.
*कोट*
युपीएससी व राज्य सेवा स्पर्धापरिक्षा या देशातील अत्यंत कठीण अशा समजल्या जातात. या परिक्षांमधून देशाच्या प्रशासनात एक कौशल्याधिष्ठीत व मुल्याधिष्ठीत समाजिक जाण असणारा युवक जावा, व त्याचा देश उभारणीच्या कार्यात हातभार लागावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे, “एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस” या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून असेच चांगले अधिकारी प्रशासनात पाठविण्याचा आमचा मानस आहे.
– प्रा. डॉ. मंगेश कराड,
कुलगुरु तथा कार्याध्यक्ष,
एमआयटी एडीटी विद्यापीठ, लोणी-काळभोर, पुणे
______________________________
*संवाद मीडिया*
🏠🏠🏠🏠🏠🏠🏠
*🏠 SK 🏠*
*VASTU*
*CONSULTANT*
*🏘️🏘️ SK VASTU CONSULTANCY* 🏘️🏘️
*🔸We solve all problems related to Vastu*
*🔹We suggest solutions for Vastu Dosha*
*🔸We solve all Vastu Kundli related problems*
*_Vastu specialist in house, hotels, mall, school, college, showrooms, shop, factory, hospital_*🏥🏬🏘️🏢🏣
*Contact details:-*
📲9892009443
📲9930787451
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*