You are currently viewing मालवण तालुक्यातील राठीवडेत अज्ञात वाहन अंगावरून गेल्याने मद्यधुंद इसमाचा जागीच मृत्यू

मालवण तालुक्यातील राठीवडेत अज्ञात वाहन अंगावरून गेल्याने मद्यधुंद इसमाचा जागीच मृत्यू

मालवण तालुक्यातील राठीवडेत अज्ञात वाहन अंगावरून गेल्याने मद्यधुंद इसमाचा जागीच मृत्यू

मालवण

दारूच्या नशेत रस्त्यावर आडवे पडून राहिलेल्या चंद्रशेखर आप्पा धुरी (वय ४५, रा. राठीवडे, ता. मालवण) याच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास राठीवडे भावई मंदिरा समोरील रस्त्यावर घडली आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, राठीवडे येथील चंद्रशेखर धुरी याला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन तो रस्त्यावर येऊन झोपायचा. गुरुवारी देखील तो दारूच्या नशेत असाच रस्त्यावर आडवा झाला. हे पाहून काही नागरिकांनी त्याला दोन ते तीन वेळा उठवून बाजूला नेले. मात्र तरीदेखील तो पुन्हा रस्त्यावर येऊन आडवा होत होता. मात्र रात्री ८ वाजण्याच्या सुमारास या मार्गावरून जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याच्या अंगावरून वाहन घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा