You are currently viewing देवा.‌‌.. ऐक हाक काळजातली

देवा.‌‌.. ऐक हाक काळजातली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*देवा.‌‌.. ऐक हाक काळजातली*

 

देवा ऐक आमची

हाक काळजातली

तुला आळवतो आम्ही

ऐक आस मनातली….

 

प्रामाणिकपणा कुठे

शोधायचा रे आता

फसवणूक गैरव्यवहार

दिसती येता जाता….

 

शिक्षणाचा प्रसार प्रचार

पण कुठे संस्कृती संस्कार

विसरले सर्व सदाचरण

करतात संकुचित विचार…

 

खेळ मैदान व्यायाम

मुलं कुठे दिसत नाही

मोबाईल हाती दिवसभर

खाण्याची ना शुद्ध राही…

 

मोठ्यांचा आदर सन्मान

अनुभवाचे असते भांडार

दुर्लक्षित होतात वृद्ध

जीवन बनते त्यांचे लाचार…

 

अंधश्रध्देचे पेव फुटते

उच्चशिक्षितही त्यात बळी

पैसा प्रसिद्धी हवी असते

हव्यासाची ती साखळी…

 

बुध्दीदाता तू गणेशा

हाक ऐक काळजातली

सद्बुद्धी दे सकलांना

माणसं घडव माणसातली।।

 

******* ****** *******

*अरुणा दी.दुद्दलवार दिग्रस*

*यवतमाळ*

प्रतिक्रिया व्यक्त करा