You are currently viewing कोलगाव येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या मुलाला दुचाकीची धडक…

कोलगाव येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या मुलाला दुचाकीची धडक…

कोलगाव येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या मुलाला दुचाकीची धडक…

गंभीर जखमी, गोवा-बांबोळी येथे हलविले…

सावंतवाडी

रस्त्यालगत उभ्या असलेल्या १० वर्षीय मुलाला अज्ञात दुचाकीस्वाराने धडक देत पलायन केले. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. निलेश जनार्दन पाटील (वय १०, रा. कोलगाव-भोमवाडा) असे त्याचे नाव आहे.

ही घटना आज सायंकाळी जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील कोलगाव येथील भवानी स्टीलच्या समोर घडली. दरम्यान निलेशला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतू त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. त्याच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा