You are currently viewing पार्वतीसुत

पार्वतीसुत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पार्वतीसुत*

 

पार्वतीच्यासुता तुला शिवाचं वरदान

गाता तुझे नाम हेरंबा हरावे देहभान||

 

व्हावे आगमन ढोल-ताशांच्या गजरात

नाचावे उत्साहाने चाले लेझिम जोरात

सुबक मूर्ती मखरात करु विराजमान ||

 

शोर्य युद्धातले,पाही अचंभित उमापती

स्वपुत्रा छेदिले जाणता आला काकुळती

गजमुखा तुला दिधला अग्रपूजेचा मान ||

 

दिव्य तुझे रुप, लंबकर्ण लंबोदरा

मातृपितृभक्त,प्रिय कार्तिकेय सहोदरा

एकदंता शोभे तव शुंडा लंबायमान ||

 

रुळे मोहकसा जपाकुसुमांचा हार

रुचकर मोदकांची तुला आवड फार

दुर्वांकुर सोंडेत खोविले शिरी शमीपान ||

 

विजया केळकर ______

नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा