*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*विषय – गौरीआगमन*
गौरी आल्यात अंगणी
रंग रंगांची रांगोळी
आले गौरी गणपती
सोनं पावले नटली
पाना फुलांनी सजवा
लावा तोरण दाराला
कलशाची करू पुजा
टिळा कुंकाचा सजला
दिव्या दिव्यांनी सजली
मखराची शोभा किती
देव्हाऱ्यात नंदादीप
लक्ष लक्ष दिपज्योती
शालू हिरवा नेसवा
चोळी खणाची तीजला
नाकी नथनी हिऱ्याची
वेणी गजरा सजला
चुडा हिरवा हातात
नथ सुंदर नक्षीची
गळसरी गळ्यामध्ये
ओटी खणा नारळाची
नैवेद्याला गोड पोळी
पक्वान्नाचे वाढा ताट
काढा रांगोळी गौरीला
चंदनाचे पिढे पाट
ज्येष्ठा आणि कनिष्ठा
मुला मांणसात बैसली
त्यांच्या येण्याने घराला
शोभा दिव्यत्वाची आली
.
*शीला पाटील. नाशिक.*