*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम अष्टाक्षरी काव्यरचना*
*गौरी गणपती*
दरवर्षी येतो बाप्पा
सण गौरी गणपती
आला मिरवित देव
आल्या गौराई सोबती ॥१॥
ढोलताशे वाजवीत
स्वारी आली ठुमकत
संगीताच्या तालावर
मुषकाची ही सोबत ॥२॥
पाच दिवस बाप्पाचे
तीन दिवस गौराई
मोठी आरास मांडून
सण साजरा हो होई ॥३॥
गणपती भेटीलाही
महालक्ष्मी आतूरली
निवारण संकटाचे
लक्ष्मी नांदायला आली ॥४॥
विसर्जन सोबतीने
देतो उत्सव उल्हास
वाट पाहे दरवर्षी
होता आनंद जनास ॥५॥
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*(चांदवडकर ) धुळे.*
7588318543.
8208667477.