You are currently viewing आवाजाचा दणदणाट १२० डेसिबल, कोल्हापुरात ५१ मंडळांवर कारवाई मंडळांसह ध्वनियंत्रणा मालकही कारवाईच्या फेऱ्यात

आवाजाचा दणदणाट १२० डेसिबल, कोल्हापुरात ५१ मंडळांवर कारवाई मंडळांसह ध्वनियंत्रणा मालकही कारवाईच्या फेऱ्यात

आवाजाचा दणदणाट १२० डेसिबल, कोल्हापुरात ५१ मंडळांवर कारवाई मंडळांसह ध्वनियंत्रणा मालकही कारवाईच्या फेऱ्यात

लेसर किरणांमुळे दोघांच्या डोळ्यातून
रक्तस्त्राव, एकाची दृष्टी मंदावली…

ध्वनि यंत्रणा व लेझर किरणांचे लाईट्स यावर निर्बंध आणावेत – राजू मसुरकर

सावंतवाडी

गणेश आगमन ४१ मंडळांनी आवाजाचा दणदणाट करून ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केले. सर्वाधिक १२० डेसिबल आवाजाची नोंद करून मंडळांनी नकोसा विक्रम नोंद केला. संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह मालकांवरही न्यायालयात खटले दाखल केले जाणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार गणेश आगमन मिरवणुकीत मंडळांनी ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याचे पालन करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले होते. मात्र, आगमन मिरवणुकीत सहभागी झालेल्या ५१ मंडळांनी आवाज मर्यादिचे उल्लंघन केले. रहिवासी क्षेत्रात ५५, तर व्यावसायिक क्षेत्रात ६५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज वाढवू नये, असे कायदा सांगतो. मात्र, मंडळांनी नियमांकडे दुर्लक्ष करीत प्रत्यक्षात १२० डेसिबलपर्यंत आवाजाचा केली.

ध्वनियंत्रणा पोलिसांकडूनअशी होऊ शकते

शिक्षा ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार दोषी आढळल्यास संबंधितास एक लाख रुपये दंड किंवा पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. यापूर्वी गुन्हे दाखल झालेल्या काही मंडळांचे पदाधिकारी अजून न्यायालयात हेलपाटे घालत आहेत.

पोलिसांच्या तीन पथकांनी शनिवारी सायंकाळी सहा ते रात्री बारापर्यंत मिरवणुकीतील मंडळांच्या ध्वनियंत्रणांची तपासणी केली.

लेसर किरणांमुळे दोघांच्या डोळ्यातून
रक्तस्त्राव, एकाची दृष्टी मंदावली…

मिरवणुकीतील लेसरच्या धोकादायक किरणांच्या प्रखर झोतामुळे उचगाव येथील एका तरुणाच्या डोळ्याला इजा झाली आहे. डोळ्यातून रक्तस्त्राव झाल्यामुळे हा तरुण प्रतिभानगर येथील एका नेत्र रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याची दृष्टी मंदावली आहे. या मिरवणूक काळात बंदोबस्तासाठी असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या डोळ्याला लेसर किरणांमुळे इजा झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी नेत्र शल्यचिकित्सक संघटनेकडून माहिती मागवली आहे. एका मिरवणुकीत लेसर किरणांचा उचगाव येथील गणेश मंडळांच्या प्रखर पडल्यामुळे आदित्य बोडके या ३२ विद्युतझोत डोळ्यावर वर्षीय तरुणाच्या डोळ्याला इजा झाली आहे.

नेत्र संघटनेकडून मागवली माहिती

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक संघटनेचे अध्यक्ष डॉ. चेतन खारकांडे आणि सचिव डॉ. मंदार जोगळेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी २७ ऑगस्ट रोजीच जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गणेशोत्सव काळात लेसर किरणांच्या वापरावर बंदी घालावी, अशी मागणी केली होती.

या धर्तीवर सिंधुदुर्गातील ‌ गणेश मिरवणुकीमध्ये ‌ ध्वनि यंत्रणा व लेझर किरणांचे लाईट्स यावर निर्बंध आणावेत अशी मागणी राजू मसुरकर यांनी केली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा