You are currently viewing गणेशोत्सव

गणेशोत्सव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष श्री.महाकवी कालिदास प्रतिष्ठान लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम लेख*

 

*गणेशोत्सव*

🚩⚛️🕉️⚛️🚩

 

*ओम गं गणपतयेनं:*

*गणरायाचा मूल बीजमंत्र हा *गं* *आहे या सर्वश्रुत मंत्राचा श्रद्धेने नित्यनेमाने जप केल्यास जीवनातील सर्व मनोकामना सर्वार्थाने पूर्ण होतात आणि याची प्रचिती आहे*

 

भारतीय प्राचीन परंपरेत देवदेवतांना अत्यन्त महत्व असून भारतीय पारंपारिक संस्कृती आणि वैविध्यपूर्ण एकात्मतेचे सामूहिक मूर्तस्वरूप असून श्रद्धा , भक्ती यांनी प्रेरित आहे. भारतभूमी ही देवतांची तसेच ऋषीमुनींची , संतांची परमवीरांची , जाज्वल्य देशभक्तांची , शूर क्रांतिकारकांची विद्वानांची , विचारवंतांची सहिष्णू अशी जन्मभूमी आहे हे सर्वश्रुत आहे. हिंदुसंस्कृती ही सर्व जगतात श्रेष्ठ मानली जाते. आपल्या भारतीय परंपरेतील सर्वच प्राचीन वेदकालीन धर्मग्रंथामध्ये म्हणजे महाभारत , रामायण , गीता , भागवत , ज्ञानेश्वरी , तुकाराम गाथा , दासबोध , गुरूग्रंथ साहिब अशा अनेक ग्रंथातून , सकलसंत गाथेतून या संस्कृतीचा , सकल देवदेवतांच्या साक्षत्काराचा उल्लेख आपल्याला जाणवतो.

33 कोटी देवतांचा उल्लेख केला जातो . पण प्रत्यक्षात *शंकरपार्वती पुत्र गणपती* हे सर्व देवतांमध्ये *आधी दैवत , *आराध्य दैवत* मानले जाते ही अनादीकालीन परंपरा आहे. गणेश जन्माची कथा ही सर्वांनाच माहिती आहे. गणेश पुराण या ग्रंथात गणपती या देवतेबद्दल समग्र माहिती दिलेली आहे. गणपतीची अनेक नावे आहेत. गणपती , गणेश , गजानन , धुम्रवर्ण , वक्रतुंड , महाकाय, पार्वतीनंद, एकदंत , हेरंब , गणनायक , वरद , गजवदन , प्रणवाकार अशी अनेक नावे आहेत. भारतदेशामध्ये या गणरायाची सर्वत्र अत्यन्त श्रद्धेने आद्यपूजा केली जाते. कुठल्याही शुभ कार्यात त्याची आद्यस्थापना करून मंगल कार्याची सुरुवात करणे ही पारंपारिक हिंदु / भारतीय संस्कृती आहे. साहित्य , कला , संस्कृती मध्ये या गणेश देवतेचे विशेष महत्व असून प्रथम त्याचीच प्रतिष्ठापना केली जाते. *प्राचीन काळी ७५० वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलीने लिहिल्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये देखील आद्यदेवता गणेश याचीच रूपके आढळतात. प.पू. राष्ट्रसंत रामदास स्वामींनी देखील रचलेल्या गणपतीच्या आरतीमध्ये देखील .. गणरायाची जी स्तुती केली आहे त्यामध्ये ” *तू सुखकर्ता , तू दुःख हर्ता* *विघ्न हर्ता* असून तुझ्या दर्शनाने साऱ्या मनोकामना पूर्ण होतात. साऱ्या अष्टसिद्धी प्राप्त होतात अशी मंगल कामना व्यक्त केली आहे. *गणपती अथर्वशीर्ष* या मंगल स्तोत्राचे पठण करण्याची प्रथा सर्वत्र असून ती सर्वार्थाने फलद्रुप ठरते ही भारतीय संस्कृतील देशव्यापी *अढळ श्रद्धा* आहे.

गणपती हा पुराणकालीन *महाभारताचा* लेखनिक होता. भारत देशातच नव्हे तर परदेशातही गणेशाची पूजा आज केली जाते.

गणेशभक्तांना सर्वत्र *गाणपत्य* या नावाने ओळखले जाते. गणपती उपासना ही कल्याणकारी असून श्रद्धेने गणपतीची पुजाभक्ती केल्यास भक्तांच्या सर्व ईच्छा पूर्ण होतात अशी श्रद्धा ,प्रचिती आहे.

श्रीगणेशाची जगभरात विविध ठिकाणी , विविध रुपात , विविध गोष्टीसाठी प्रसिद्ध असलेली मंदिरे आहेत. त्या मागे अनेक रंजक आख्यायिका देखील आहेत. आणी या साऱ्याच गोष्टी धार्मिक , सांस्कृतिक , अध्यात्मिक अशा भारतीय संस्कृतीच वैभव आहे. म्हणून या गणेशोत्सवाचे महत्व फक्त महाराष्ट्रातच नसून सर्व भारतात तसेच पाश्च्यात्य देशातही आहे. हा गणेशोत्सव सर्व जगतात साजरा होत असतो.

महाराष्ट्रात *अष्टविनायक* म्हणून गणपतीची आठ दर्शनिय व जागृत मंदिरे आहेत. या जागृत अशी गणपती मंदिरे असून त्या ठिकाणांचे विशेष महात्म्य असल्यामुळे *श्रद्धा, भक्ती , प्रचिती* या तिन्ही दृष्टांतामुळे तिथे नेहमीच भक्तांची वर्दळ असते.

*हा गणपती हा बुद्धिदाता सकल कलांचा उद्गाता असून सर्वशक्तिमान असून साऱ्या जगभरात त्याचा *गणेशोत्सव हा सण* सार्वजनिक उत्सव म्हणून भाद्रपद शुक्ल चतुर्थीला धार्मिक व्रत श्रद्धा म्हणून आजही १० दिवस साजरा केला जातो. त्याला महासिद्धिविनायक़ी चतुर्थी किंवा *शिवा* म्हणूनही साजरा केला जातो. आणि या उत्सवाला हिंदू धर्मात विशेष साधारण महत्व आहे.

*थोर देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी प्रजेची मनेमने सर्वार्थाने सांधण्याचा आणि सर्व भारतीय बंधूभगिनींना एकत्र आणण्याच्या कल्याणकारी संकल्पनेतून या धार्मिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. त्यातून सर्वार्थाने सामाजिक प्रबोधन करणारे सांस्कृतिक , कार्यक्रम घडावेत. त्या उत्सवातून अनेकांना उद्योग , रोजगार उपलब्ध व्हावा व एक संस्कृतीप्रधान ऐक्य निर्माण व्हावे.या एकमेव उद्देशाने हे आद्यकर्तव्य आहे असे समजून *लोकमान्य बाळ गंगाधर टिळक* यांनी हा गणेशोत्सव सुरू केला होता. पूर्वी 60/70 वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. पौराणिक जीवंत देखावे , कलापथके , मेळे , कथाकथन , भावगीत गायनाचे , चित्रकला प्रदर्शन , रांगोळी असे अनेक प्रबोधनात्म , मनोरंजनाचे कार्यक्रम होत असत. परंतु आजकाल मात्र हा उद्देश आजकाल पूर्णत्वास येतो आहे असे वाटत नाही , ही सांस्कृतिक , सामाजिक शोकांतिका आहे असे नाईलाजाने म्हणावे लागते.

सगळीकडे ओंगळ, कर्कश्य डीजे , बीभत्स नाचगाणी , हावभाव , अनावश्यक खर्च , याचा अतिरेक जाणवत आहे. ही आजची वास्तवता आहे.

*प्रत्यक्षात हा गणेशोत्सव साजरा करताना त्यातील सामाजिक , धार्मिक , प्रबोधात्मक , वैचारिक सलोखा निर्माण करण्याचा जो मूलभूत उद्देश आहे त्याचा विचार होणे गरजेचे आहे. आणी यासाठी सतर्कतेने विचार केला गेला तर या *गणेशोत्सवाचा*

*उद्देश सर्वाथाने सफल होईल ..!!*

 

यासाठी *समाजपुरुष* जागृत होणे गरजेचे आहे आणि ती काळाची नितांत गरज आहे. हा मूलभूत विचार मनांत बाळगुन हा गणेशोत्सव सातत्याने साजरा होत रहावा. सामाजिक मानवतेचे ऐक्य आबाधीत रहावे हा उद्देश सफल व्हावा..

 

*इती लेखन सीमा*….

*वि.ग.सातपुते*

*संस्थापक अध्यक्ष :-*

*महाकवी कालिदास प्रतिष्ठान*

*पुणे , मुंबई , ठाणे.(महाराष्ट्र)*

*9766544908*

प्रतिक्रिया व्यक्त करा