You are currently viewing आगमन गणरायाचे

आगमन गणरायाचे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आगमन गणरायाचे*

 

गणराय आगमनाची

लगबग सुरू झाली

शुभ आरास मखराची

सारी दुकाने सजली

 

दारी सडा सारवण

रंग रंगीत रांगोळी

मंगल तोरण दाराला

लक्ष दिव्यांच्या या ओळी

 

चंदनाचा पाट ठेवा

बाप्पा गणराया बसाया

रिद्धी सिद्धी उभ्या दोघी

मंगल आरती कराया

 

चांदीच्या तबकात

प्रसाद ठेवु मोदकांचा

लावु समई निरांजन

गुच्छ पुढे जास्वंदीचा

 

सुवासिक धुप दिप

तेजोमय दिप पुढे

पंच पदार्थांचा ठेवा

आरती म्हणुया गडे

 

गणरायाची करु पुजा

दहा दिवसांची आरास

दुर्वा जास्वंदीची माळा

मोती चढली मखरास

 

बाप्पा बसला मखरी

नतमस्तक होऊ या

आयुष्य भराचे सुख

देई माझा गणराया

 

*शीला पाटील चांदवड*

प्रतिक्रिया व्यक्त करा