You are currently viewing काव्यपुष्प- ६२ वे

काव्यपुष्प- ६२ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वी देशपांडे लिखित श्री गजानन विजय काव्यांजली

*काव्यपुष्प- ६२ वे*

—————————————-

ही गडबड एक झाली । बाळापुरी, लोक सारी म्हणाली । डॉक्टराला बोलवा, परिस्थिती बिकट आली ।

म्हणे, भास्कर लोकांना- माझे वैद्य, डॉक्टर गजानन हो ।। १ । ।

 

स्वामी भास्करा म्हणाले । आता तुझे आयुष्यच सरले ।

तरी सांग तुझ्या मनातले । कुत्रे चावले , निमित्त असे रे ।।२।।

 

विनयाने बोले भास्कर । जोडोनि दोन्ही कर । आता कशाला जर, तर । योग्य तेच करावे स्वामी तुम्ही ।।३।।

 

स्वामी हे ऐकुनी । होती समाधानी । सांगती सर्वांना जन्म-मृत्यूच्या फेरीची कहाणी । भ्रांती करिती दूर मनाची ।।४ ।।

 

बोधवाणी स्वामींची ऐकुनी । भास्कर गेला आनंदोनी ।

सेवा सार्थकी माझी गुरुचरणी। म्हणे भास्कर ।। ५ ।।

 

परतल्यावर शेगावला । भास्कर सांगे ज्याला त्याला ।

प्रकार जो घडला । बाळापुराला ।। ६ ।।

 

भास्कराने मग एक केले । मठात सर्वांना जमविले ।

त्याच्या मनातले सांगितले । या बैठकीत ।। ७ ।।

 

म्हणे, दोन महिनेच मी तुमचा । हेतू माझा हा साचा ।

करावा विचार तुम्ही याचा । सांगितला तुम्हा मी ८।।

 

बंकटलाल, पाटील हरी । मारुती चंद्रभान कारभारी ।

श्रीपतराव वावीकर,लोक भारी । जमविले भास्कराने ।। ९ ।।

*********************

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

—————————————-

कवी- अरुणदास ” अरुण वि.देशपांडे – पुणे.

——————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा