*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम शिरोमणी काव्य*
*आतुरता गणेशाची*
*गणेश*
आगमनाची शुभवार्ता
पूर्वतयारी करते आनंदाने
लंबोदरा तुझ्या स्वागताची आतुरता…..।।
*गणेश*
दुर्वांकूर जास्वंदमाला
आसनस्थ हो शिवनंदना
एकवीस मोदक अर्पितो तुला..।।
*गणेश*
बुध्दीदाता विघ्नहर्ता
चौसष्ट कला तुझ्याठायी
तूच ओंकाराचे स्वरूप असता…।।
*गणेश*
शुध्दमती प्रदान
कर गजमुखा सकलांना
मांगल्य प्रसन्नतेचे प्रार्थिते वरदान …!!
*गणेश*
तुजला वंदन
ऐक आर्त प्रार्थना
कर सगळ्या संकटांचे हरण…!!
००००००🍃🌺🍃०००००
*अरुणा दुद्दलवार@✍️*