*चित्रपटगीतांच्या मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
पिंपरी
विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘जब छाये मेरा जादू…’ या लोकप्रिय हिंदी – मराठी चित्रपटगीतांच्या
नि:शुल्क दृकश्राव्य मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड येथे गुरुवार, दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सांगीतिक मैफलीत दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, उपाध्यक्ष संतोष बाबर, माजी कार्याध्यक्ष सचिन साठे, किरण साळी, अनिल दळवी, अभिमान विटकर, सुभाष चव्हाण, राजेंद्र देसाई, नरेंद्र मोहिते, शरद शेजवळ, वि. ल. पवार, विनायक बहिरट, जीवन गायकवाड, सतीश रानवडे, विठ्ठल गरुड यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
विनायक कदम, सुजाता माळवे, नंदकुमार कांबळे, उज्ज्वला वानखेडे, शैलेश घावटे, नेहा दंडवते, अरुण सरमाने, शुभांगी पवार, अनिल जंगम, गायत्री बेलसरे, विलास खरे, अनुराधा साळवी, डॉ. किशोर वराडे, विकास जगताप या गायक कलाकारांनी आपल्या एकल आणि युगुलस्वरातील सादरीकरणातून जुन्या लोकप्रिय चित्रपटगीतांची जादू अजूनही रसिकांना मंत्रमुग्ध करते याची स्वरानुभूती दिली. विशेषत: “चुरा लिया हैं तुमने जो…” , “मेरा प्यार भी तू हैं…” , “देखो मैंने देखा हैं…” , “सौ साल पहले…” , “गुम हैं किसीके प्यार में…” , “चुरा के दिल मेरा…” , “क्या यही प्यार हैं…” , “वादा रहा सनम…” , “सुनो चम्पा सुनो तारा…” , “दिल हुम हुम करे…” अशा एकाहून एक सरस युगुल आणि द्वंद्वगीतांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. डॉ. किशोर वराडे यांनी प्रायोजकत्व स्वीकारलेली लकी ड्रॉ सोडत श्रोत्यांचे खास आकर्षण ठरले. सानिका कांबळे आणि काव्या कदम यांनी संयोजनात सहकार्य केले. विविध भारती म्युझिकल इव्हेंट या संस्थेमार्फत नवोदित गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते; तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, अशी माहिती संयोजकांनी दिली.
कार्यक्रमादरम्यान शिक्षकदिनाचे औचित्य साधून शुभांगी पवार, नेहा दंडवते, गायत्री बेलसरे, अनुराधा साळवी, उज्ज्वला वानखेडे, डॉ. अनिकेत गरुड, डॉ. सारिका निकम, डॉ. आशिष चिंबळकर या शिक्षकांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
विनायक कदम आणि नंदकुमार कांबळे यांनी संयोजन केले. शैलेश घावटे यांनी ध्वनिसंयोजन केले. सौमिल यांनी दृकश्राव्यचित्रण केले. अरुण सरमाने आणि डॉ. किशोर वराडे यांनी निवेदन केले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२