भरड येथे घरात घुसलेल्या सात फुटी अजगरास जीवदान…
मालवण
शहरातील भरड येथील नंदू मालवणकर यांच्या घरात घुसलेल्या सात फुटी अजगरास सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी पकडले त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान देण्यात आले.भरड येथील नंदू मालवणकर यांच्या घरात काल रात्री मोठा अजगर घुसला असल्याचे त्यांच्या आईच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मालवणकर यांनी स्थानिक माजी नगरसेवक यतीन खोत, शिल्पा खोत यांना देताच त्यांनी कांदळगाव येथील सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांना या घटनेची माहिती देत पाचारण केले. त्यानंतर सर्पमित्र परुळेकर यांनी घटनास्थळी येत मोठ्या शिताफीने त्या सात फुटी अजगरास पकडले. त्यानंतर रात्री उशिरा त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
यावेळी यतीन खोत, शिल्पा खोत, तनिष्का खोत, आशु खोत, प्रल्हाद माळकर, नंदू मालवणकर, यश दामले यांच्यासह अन्य स्थानिक नागरिक उपस्थित होते.