You are currently viewing एकात्मता… (दशाक्षरी रचना)

एकात्मता… (दशाक्षरी रचना)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*एकात्मता… (दशाक्षरी रचना)*

 

मी एकटा सर्वांवर भारी!

म्हण जाहली जुनी पुरानी…

पाखरांसम एक होऊनी

प्रेम प्रीतीची गाऊया गाणी…। १.

 

एकात्मतेचे बळ आगळे!

सांग शिकवण नाही नवी…

एक धागी ओवून जनांना

एकसंधशी माळ बनवी…। २.

 

वज्रासमान बळ एकीचे

भरे उर्जा, ग्वाही अभयाची…

येवो बाधा कित्येक कितीही

ढाल बने हरेक जीवाची…। ३.

 

वचने तैसी कर्मही राहो

मंत्र खरा आचारसंहिता…

बोल एक नि करणी दुजी

नकोच ऐसी मानसिकता…। ४.

 

नसतो कोणी लहान मोठा

समसमान मनुष्य प्राणी…

भेद वसता मनी असा तो

भेदभावाची बोलवी वाणी…। ५.

 

धर्म खरा हो मानवतेचा

सद्भावन तो माणुसकीचा!…

धर्मग्रंथही तेच सांगती

बनू सहारा एकदुजाचा…। ६.

 

✍️शशांक दिनकरराव देशमुख©®

चांदुरबाजार, जि. अमरावती

(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४

मो. क्र. ९९२३५३६३२५

प्रतिक्रिया व्यक्त करा