You are currently viewing खेळ संस्कृती जनमानसात रुजायला हवी तर देशाचे खेळविश्व आघाडीवर असेल – प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर

खेळ संस्कृती जनमानसात रुजायला हवी तर देशाचे खेळविश्व आघाडीवर असेल – प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर

 

बांदा

“संत तुकाराम महाराजांनी शंभर अभंग खेळावर लिहिले आहेत. खेळ ही एक संस्कृती आहे रामायण, महाभारतामध्ये पारंपरिक खेळ खेळले जात होते. खेळ हे सामाजिक संस्कृतीला प्रेरणा देणारे असतात तर शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्याबरोबर सहासी खेळ खेळले. ही खेळ संस्कृती जनमानसात रूजायला हवी तरच भविष्यात भारतीय क्रीडाविश्व आघाडीवर असेल ” असे प्रतिपादन प्राचार्य डाॅ. गोविंद काजरेकर यांनी येथे केले.

गोगटे – वाळके कॉलेज, बांदा येथील महाविद्यालयातील क्रीडा विभागामार्फत हाॅकीचे जादूगार ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून क्रीडादिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डाॅ.काजरेकर यांनी सदर प्रतिपादन केले.

प्रास्ताविक व स्वागत क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. शरद शिरोडकर यांनी केले ते म्हणाले की, “मानवी जीवनातील सर्वोच्च आविष्कार खेळात होतो. त्यामुळे सततची युद्धे , दहशतवाद, संघर्ष आणि हिंसा यांनी होरपळलेल्या देशांमध्ये मानवी मनाला दिलासा देण्याचे व आशावाद जिवंत ठेवण्याचे काम खेळ व खेळाडू करतात”

महाविद्यालयाचे खेळाडू सीमा नाईक व यश गावडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा.डाॅ. रमाकांत गावडे यांनी केले तर आभार प्रा. प्रसाद जाधव यांनी व्यक्त केले यावेळी क्रीडा सदस्या प्रा. रश्मी काजरेकर , सदस्य प्रा. सुधीर न्हावेलकर उपस्थित होते. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी वर्ग आणि प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा