You are currently viewing भाजपा च्या वतीने वेंगुर्ले शहरातील आंगणवाडी सेविका / मदतनीस यांचा सत्कार

भाजपा च्या वतीने वेंगुर्ले शहरातील आंगणवाडी सेविका / मदतनीस यांचा सत्कार

*भाजपा च्या वतीने वेंगुर्ले शहरातील आंगणवाडी सेविका / मदतनीस यांचा सत्कार*

*गणपतीनंतर तालुक्यातील १४७ आंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा जिल्हापरिषद मतदार संघनिहाय भाजपा च्या वतीने सत्कार*

वेंगुर्ले

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील आंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार *बुधवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी * भाजपा तालुका कार्यालयात *महीला मोर्चा जिल्हाध्यक्षा तथा मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेची सावंतवाडी विधानसभा क्षेत्र समिती अध्यक्ष सौ.श्वेता कोरगावकर* यांच्या शुभहस्ते करण्यात आले .
शासनाची मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना वेंगुर्ले शहरात प्रभावी पणे राबविण्यात आल्यामुळेच बहुसंख्य महिलांना या योजनेचा लाभ मिळाला , या त्यांच्या कार्याची दखल घेऊन भाजपा च्या वतीने सत्कार आयोजित केल्याचे मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना , सावंतवाडी विधानसभा क्षेत्र समिती सदस्य व जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी सांगीतले .
यावेळी मार्गदर्शन करताना महिला जिल्हाध्यक्षा श्वेताताई कोरगावकर म्हणाल्या की , मुख्यंमत्री माझी लाड़की बहिण योजनेचे पात्र लाभार्थी महिलेचे नोंदणी करण्यास सप्टेंबर 2024 पर्यत सुरु ठेवणे मान्यता दिल्यामुळे महीला भगिनींन मध्ये महायुती सरकार बद्दल समाधानाचे वातावरण पसरले आहे .
राज्यातील महीलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात ” *मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण* ” योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे .
केंद्र सरकारनेही ” नारी शक्तीचे ” सक्षमीकरण करत असताना यंदाच्या अर्थसंकल्पात देखील महिला – प्रणित विकासाला चालना देण्यासाठी ३ लाख कोटींहुन अधिक रुपयांची तरतूद करण्यात आली आहे . अशा प्रकारच्या निर्णयामधुन महिलांच्या आर्थिक विकासासाठी सरकार कडुन केले जात असलेले प्रयत्न आणि वचनबद्धता दिसुन येते .
यामुळे या निर्णयाचे महिला वर्गाने स्वागत केले असून बर्‍याच महीलांना या निर्णयाचा फायदा मिळणार असल्याने महीलांनी राज्य व केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
यावेळी वेंगुर्ले शहरातील अल्फिना मोझेस फर्नांडिस , विशाखा विजय गावडे ,स्मिता शंकर कोनेकर , निशा निकेश पवार , अश्विनी अजित पालव ,
सुप्रिया सुरेश बहिरे , नयना रामचंद्र आरेकर , सत्यभामा कालिदास गावडे , स्नेहलता फाटक , राधा बागवे , सुनीता गणपती कांबळी , रिटा बस्त्याव अल्मेडा , एकता एकनाथ परब या आंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा शाल व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री विनायक ऊर्फ सुहास गवंडळकर (तालुकाध्यक्ष), श्री प्रशांत प्रभुखानोलकर (तालुका सरचिटणीस), श्री दिलीप ऊर्फ राजन गिरप (माजी नगराध्यक्ष), सौ सुषमा प्रभू खानोलकर(जिल्हा उपाध्यक्ष),श्री साई प्रसाद नाईक ( जिल्हा निमंत्रीत) , श्री प्रितेश राऊळ ( जिल्हा का. का. सदस्य), सुजाता पडवळ (महिला मोर्चा तालुकाध्यक्ष), सौ वृंदा गवंडळकर (महिला जिल्हा उपाध्यक्ष ), सौ श्रेया मयेकर (शहराध्यक्ष), सौ रसिका मठकर(शहर सरचिटणीस), सौ आकांक्षा परब( महिला मोर्चा चिटणीस), श्री विष्णू परब (सरपंच अध्यक्ष), श्री प्रणव वायंगणकर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष , श्री अनंत केळुसकर ( मच्छीमार सेल ), आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

______________________________
*संवाद मीडिया*

*मंगलमूर्ती मोरया*
*गणपती बाप्पा मोरया..!!*🙏🙏

*_गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या गणेश भक्तांचं माई ह्युंदाईच्या वतीने मनःपूर्वक स्वागत…!!_*

*_आपल्या ह्युंदाई कारच्या देखभालीसाठी आम्ही आहोत 24×7 आपल्या सेवेत.._* 🚗🚕

*_कोणत्याही प्रकारच्या इमर्जन्सी सर्व्हिसेससाठी कॉल करा…_*

*MAI HYUNDAI*

*अविरत सेवेची 25 वर्षे*

*कुडाळ*
📲 7410006037

*कणकवली*
📲 8956130166

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा