You are currently viewing काव्यपुष्प-९३ वे

काव्यपुष्प-९३ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली*

 

*काव्यपुष्प-९३ वे*

—————————————–

 

उत्सवास जो आला । श्रीमहाराजांनी त्यास उपदेश केला ।

चित्तात ठेवा समाधानाला । नका विसरू कधी रामनामाला ।। १ ।।

 

दोन्ही मंदिरात । झाली गर्दी अतोनात । त्या वर्षीच्या रामनवमीच्या उत्सवात ।तीन ठिकाणी रामजन्मांत ।।२ ।।

 

रात्री पालखी मिरवणूक निघाली । गावातून मिरवून आली ।

महाराजानी पालखीला सोबत केली । त्या मिरवणुकीत ।।३।।

 

दशमीला लोकांनी आहेर केले । कुणी वस्तू, कुणी कपडे दिले । भले ढीग जमले ।। ४ ।।

 

द्वादशीला लोक निघाले । जातांना महाराजांना भेटले ।

महाराजांनी काही ना काही दिले । नि नाम घेण्यास आग्रहाने सांगितले ।। ५ । ।

 

परी ,या उत्सवापासून । एक आले घडून । महाराज बोलती

सूचक शब्दातून ।तरी,सूचना अंतकाळाच्या या कुणा ना आल्या कळून ।। ६ ।।

 

श्रीमहाराजांना आता त्रास होत असे । थोड्या श्रमाने फार

थकवा येत असे । तरी त्यांचे लक्ष असे । आल्या-गेल्याकडे ।। ७ ।।

 

एकदा ते भाऊसाहेबास म्हणाले । मलाच सारे बघावे लागले । प्रत्येकाला द्यावे लागले । त्याच्या गरजेप्रमाणे ।।८। ।

 

नुसते म्हणता तुम्ही । आहोत ना आम्ही । परी पडता कमी।

मग मलाच करावे लागते ।। ९ ।।

—————————————–

करी क्रमशः हे लेखन – कवी अरुणदास

——————————————कवी अरुणदास ” अरुण वि. देशपांडे – पुणे.

——————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा