You are currently viewing पालकमंत्र्यांच्या हस्ते बीच क्लिनिंग मशीनचे लोकार्पण…!

पालकमंत्र्यांच्या हस्ते बीच क्लिनिंग मशीनचे लोकार्पण…!

पालकमंत्र्यांच्या हस्ते बीच क्लिनिंग मशीनचे लोकार्पण…!

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सीएसआर फंडातून विकत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला वितरीत केलेल्या बीच क्लिनिंग मशीनचे लोकार्पण पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रभाकर सावंत, मुख्याधिकारी श्री नातु आदी उपस्थित होते.

ह्या बीच क्लिनिंग मशीन जिल्हा परिषद ग्रामीण विभागासाठी दोन व नागरी विभागासाठी एक अशा एकूण 3 मशीन वेंगुर्ला, मालवण व देवगड तालुक्यातील समुद्रकिनारे तसेच देवगड शहरी भागाकरता कार्यरत असणार आहे.

मशीन बाबत तांत्रिक माहिती :

मॅन्युफॅक्चर बीच टेक नावाची मॅन्युफॅक्चर आणि मॉडेल हे बीच टेक 2000 असून हे बीच क्लीन करणारे इक्विपमेंट आहे तसेच याला 75 एचपी फोरमल ड्राईव्ह ट्रॅक्टर जोडण्यात आलेला आहे. या एका मशीनची किंमत अंदाजे एक कोटी असून त्या मशीनची 5 वर्ष सर्विस मोफत असणार आहे.

बीच क्लिनिंग मशीनला समोर एक रोटरी व्हील दिले आहे, ज्यामध्ये 40 Teeth असतात. हे व्हील 30 सेंटीमीटर, म्हणजेच जवळपास एक फूट सॅन्डच्याखाली जाऊन कचरा काढतात. नंतर तो कचरा गोल पिरणाऱ्या स्क्रीनिंग बेल्टवर टाकला जातो. या स्क्रीनिंग बेल्टच्या वायप्रेशनमुळे सॅन्ड वाळली जाते, ज्यामुळे स्वच्छ सॅन्ड बीचवर परत पडते आणि फक्त कचरा वेगळा होतो. हा कचारा मधीनच्या पाठीमागील कलेक्शन टँक, म्हणजेच हॉपरमध्ये साठवला जातो. मशीनची एकावेळी क्लिनिंग क्षमता दोन मीटर आहे. ज्यामुळे तासाला सहा एकर बीच स्वच्छ केला जाऊ शकतो. हा पुर्ण भरल्यावर त्याचा कचरा डंपर किंवा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये अनलोड केला जातो. यांची अनलोडींग हाइट अडीच मिटर आहे. दोन क्युबिक मीटर असून त्यामध्ये सरासरी 1000 किलो म्हणजेच एक मीटर कचरा साठवता येतो. हा पूर्ण भरल्यावर त्याचा कचरा डंपर किंवा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये अनलोड केला जातो. याची अनलोर्डींग हाईट अडीच मीटर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक बिचेस आहेत जिथे दुरिस्ट मोठ्याप्रमाणात येतात. त्यामुळे अशाच प्रकारच्या बीच क्लिनिंग मशीन उपलब्ध करून दिल्यामुळे बीच स्वच्छ आणि पर्यटकांसाठी आकर्षक राहण्यास मदत होणार आहे.

000 000

प्रतिक्रिया व्यक्त करा