You are currently viewing माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची शिरोडा ग्रामपंचायतीला भेट…

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची शिरोडा ग्रामपंचायतीला भेट…

वेळागर किनारपट्टी वरील जागा मिळावी ग्रा.पं. ला पर्यटन व्यवसायाला; ग्रामपंचायतीतर्फे निवेदन

शिरोडा
शिरोडा वेळागर किनारपट्टीवरील चार एकर जागा ग्रामपंचायतीला पर्यटन व्यवसायासाठी मिळावी तसेच मिठाच्या सत्याग्रहाचा ठिकाणी महात्मा गांधींचे स्मारक व्हावे यासाठी सुरेश प्रभू यांना निवेदने देण्यात आली.शिरोडा गावात पिकवल्या जाणार्‍या मिठाची चव देश-विदेशात पोचलेली असून येथील मिठाचा देशव्यापी सत्याग्रह ज्या ठिकाणी झाला त्या जागेवर महात्मा गांधींचे स्मारक होण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांनी शिरोडा येथे केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले खासदार सुरेश प्रभू यांनी शिरोडा ग्रामपंचायतीला धावती भेट दिली त्यावेळी ग्रामपंचायत तर्फे मिठाच्या सत्याग्रहा ठिकाणी महात्मा गांधीजींचे स्मारक व्हावे व बेरोजगारी विषयी तसेच मच्छीमार बांधव संदर्भात ग्रामपंचायत तर्फे निवेदने देण्यात आली त्यावेळेस सुरेश प्रभू बोलत होते.
मीठ सत्याग्रह स्मारक संदर्भात आपण दिलेल्या आश्वासन प्रमाणे दिल्लीला गेल्यावर त्या फाइलवर सही केली केंद्र शासनाची मंजुरी मान्यता आहे तरी पण राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून मंजुरी आली पाहिजे असेही त्यांनी सांगितले त्यांना ग्रामपंचायत तर्फे निवेदने देण्यात आली त्यावेळी सरपंच मनोज उगवेकर यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी जि प सदस्य प्रितेश राऊळ रेडी सरपंच रामसिंग राणे शिरोडा ग्रामपंचायत उपसरपंच रवी पेडणेकर भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसंना देसाई माजी सरपंच विजय पडवळ बाबा नाईक सुहास गावंढळकर बाबली वायंगणकर दादा केळूसकर ग्रामपंचायत सदस्य कौशिक परब दिलीप गावडे संजय फोडनाईक समृद्धी धनजी तृप्ती परब प्राची नाईक सुनील चव्हाण लक्ष्मीकांत करपे संदीप धनाजी वगैरे व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सुरेश प्रभू म्हणाले ज्या ठिकाणी देशव्यापी मिठाचा सत्याग्रह झाला त्याठिकाणी महात्मा गांधीजींचे स्मारक होणे आवश्यक आहे पंचक्रोशीतील ग्रामस्थांची ही मागणी रास्त आहे शिरोडा हे गाव माझे आजोळ असून या परिसरातील जनतेने मला कायमच प्रेम दिले आहे या प्रेमापोटी मी आज शिरोडा गावाला भेट दिली असून गांधीजींचे स्मारक होण्यासाठी माझे प्रयत्न राहतील मी त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.
शिरोडा ग्रामपंचायतीने पर्यटन विकासाच्या माध्यमातून शिरोडा वेळागर बीचवर रोजगाराच्या दृष्टीने नियोजन झाले पाहिजे वेळागर चा नितांत सुंदर असा समुद्र बीच आहे वेळागरची जागाही यापूर्वी महाराष्ट्र सरकारने पंचतारीक हॉटेलसाठी खाजगी कंपनीला करार स्वरूपात दिलेली आहे. त्या करारामुळे तीव्र स्वरूपाची आंदोलने झाली असून स्थानिकांना पोलिसांकडून मारहाणी सुद्धा झाली होती सरकारने केलेल्या कराराबाबत स्थानिक जनते मध्ये आजही संभ्रम व नाराजी आहे या परिसरात पर्यटन वाढीसाठी स्थानिकांना विश्वासात घेण्याची गरज आहे पर्यटन वाढीसाठी स्थानिकांना विश्वासात घेण्याची गरज असते पण शासनाकडून त्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत हे दुर्दैवी आहे सुरुची बाग शिरोडा समुद्रकिनारा हेच पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. पर्यटनातून अनेक सर्वसामान्य स्थानिक ग्रामस्थांना जीवनावश्यक रोजगार प्राप्त होत आहे करिता पर्यटकांना आकर्षित करीत शिरोडा वेळागर समुद्र किनारपट्टी लगतची चार एकर जागा ग्रामपंचायत च्या ताब्यात मिळावी तसेच शिरोडा बीच वर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जमिनीची नितांत गरज असल्याने आपण याकडे लक्ष घालून आम्हाला समुद्रकिनारपट्टी जवळील चार एकर जागा देण्यात यावी यासाठी आपण लक्ष घालावे व भविष्यात होणाऱ्या प्रकल्पामुळे आजची संधी हिरावून घेतली जाणार नाही या दृष्टीने सुयोग्य नियोजन व समन्वय आपल्या योजनांमधून हे शक्य होईल असे निवेदनात म्हटले आहे तसेच केरळ कर्नाटक राज्याच्या धर्तीवर शिरोडा पंचक्रोशीतील मच्छीमार व्यावसायिकांसाठी पेट्रोल व रॉकेलवर सबसिडी मिळण्यात यावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरील मच्छी व्यवसाय करणाऱ्या मच्छिमार बांधवांसाठी केरळ व कर्नाटक या राज्यांमध्ये डिझेल व रॉकेल सबसिडी दिली जाते त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांना पेट्रोल सबसिडी उपलब्ध करून द्यावी तसेच शिरोडा पंचक्रोशी मध्ये शिरोडा गांधीनगर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीचे स्मारक बाबत आपण स्मारकाचे बांधकाम करण्यासाठी सहकार्य करावे यासाठी शिरोडा गांधिनगर येथील शासकीय जमीन सॉल्ट डिपारमेंट सेंट्रल गव्हर्मेंट चे नावे दाखल आहे सदर जमिनीपैकी काही जमीन ग्रामपंचायतीने नियोजित महात्मा महात्मा गांधी स्मारकाचे बांधकाम करण्याची हस्तांतरित करून मिळावी अशी मागणी केलेली आहे त्यासाठी सदर जमीन ग्रामपंचायत नावे हस्तांतरित करण्यास सॉल्ट डिपार्टमेंट ने तयारी दर्शविली याबाबतचे पत्र आपणा स माहिती सादर करीत आहोत करिता नियोजित महात्मा गांधी स्मारक बांधणे बाबत व सदर प्रस्ताव मंजूर होणे बाबत आपण लक्ष घालावे अशी ग्रामपंचायत तर्फे निवेदन देऊन मागणी करण्यात आली

प्रतिक्रिया व्यक्त करा