आमदार नितेश राणे यांची “मोदी एक्सप्रेस” चाकरमानी गणेश भक्तांना घेऊन कणकवली कडे रवाना
*१२ वर्षे गणेश भक्तांना मोफत प्रवास करवून आमदार नितेश राणे यांनी सेवेचे एक तप केले पूर्ण
*आमदार नितेश राणे यांच्या दीर्घायुष्य आणि सातत्यपूर्ण विजयासाठी चाकरमान्यांनी घातले गणपती बाप्पाला गाऱ्हाणे
* दादर रेल्वे स्टेशन वरून रेल्वे झाली रवाना
कणकवली
कणकवली,देवगड,वैभावडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी गणेश चतुर्थी निमित्त मुंबईतून गावी येण्यासाठी चाकरमान्यांसाठी सोडलेली मोफत मोदी एक्सप्रेस रेल्वे आज ४ सप्टेंबर रोजी रवाना झाली. आमदार नितेश राणे यांनी या मोदी एक्सप्रेस ला दादर रेल्वे स्टेशनवर भाजप चा झेंडा दाखवून कोकणात रवाना केले.आमदार राणे यांचे चाकरमान्यांसाठी रेल्वे सोडण्याच्या सेवेचे हे सातत्यपूर्ण १२ वे वर्ष आहे. सुमारे अडीज हजार चाकरमानी या मोदी एक्सप्रेस मधून गावाकडे रवाना झाले.
दादर रेल्वे स्टेशनवर मोदी एक्सप्रेस मधून गावी जाण्यासाठी आज सकाळीच मोठी गर्दी झाली होती. बुकिंग असलेले रेल्वे तिकीट प्रत्येकाने आपल्या सोबत घेतले होते. आमदार नितेश राणे यांनी या मोदी एक्सप्रेसला भाजपचा झेंडा दाखवण्यापूर्वी प्रत्येक चाकर माण्याची भेट घेत आस्थेने चौकशी केली. ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर ही रेल्वे कोकणाकडे रवाना झाली. यावेळी आमदार नितेश राणे यांना अशीच समाजसेवा करण्यासाठी दीर्घायुष्य आणि सातत्यपूर्ण विजय मिळत राहो असे मालवणी भाषेत गाऱ्हाणे चाकरमानाने गणपती बाप्पाला घातले.