You are currently viewing भिजले डोळे

भिजले डोळे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम गझल रचना*

 

*पादाकुलक वृत्त*

 

*भिजले डोळे*

 

वाट पाहुनी थकले डोळे

भेट न होता थिजले डोळे

 

विसर पाडणे जमले नाही

आठवणींनी भरले डोळे

 

प्रेम म्हणाले “विसरुन जा तू”

विचार केला, गळले डोळे

 

शब्द मुखाशी अडून बसले

अबोल मी पण, वदले डोळे

 

सुखे वेचण्या फसवुन गेली

नजरा भिडता झुकले डोळे

 

हाव सुखाची दुःख शेवटी

पाहुन गत हळहळले डोळे

 

काळाचे मग मलम लावता

पश्चात्तापे मिटले डोळे

 

© दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा