You are currently viewing हो तू रणरागिणी

हो तू रणरागिणी

*सेवानिवृत्त शिक्षिका तथा लेखिका कवयित्री सौ प्रणोती हरीश कळमकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*हो तू रणरागिणी*

 

असशी तू जरी नाजूक

तरी बनावी तू सबला

घे तू आता हाती शस्त्र

दाखव तू नसे अबला!!

 

कर्तृत्वाने तू सिद्ध केले

सर्व क्षेत्रामधे अस्तित्व

फक्त पुस्तकी ज्ञान नको

कराटेने फुलव व्यक्तिमत्व!!

 

घर शाळा मंदिर दवाखाने

नसे स्त्री कुठे सुरक्षित

निर्भया यशस्वी घटना

का व्हावी स्त्री कलंकित!!

 

तुझ्या नजरेत ठेव दहशत

तेव्हाच असे जीवनी अर्थ

झाशीची राणीसम बनुनी

दाखव जगी तुझे सामर्थ!!

 

येईल मदतीला कृष्ण सखा

नको करू कुणा विनवणी

जळी स्थळी हे दुष्ट राक्षस

व्हावी तू आता रणरागिनी!!

 

सौ प्रणोती हरीश कळमकर.

प्रतिक्रिया व्यक्त करा