You are currently viewing आचरे येथे बाल कथाकथन महोत्सव 2024

आचरे येथे बाल कथाकथन महोत्सव 2024

*बँक ऑफ महाराष्ट्र आणि कथामाला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन*

मालवण :

आचरे येथे पूज्य प्रकाशभाई मोहाडीकर कथानगरी द्वारा ‘बिड्ये विद्यामंदिर आचरे नंबर १’ येथे रविवार दिनांक २० ऑक्टोबर २०२४ रोजी बाल कथाकथन महोत्सव साजरा होणार आहे .बँक ऑफ महाराष्ट्र – शाखा आचरे आणि साने गुरुजी कथामाला मालवण या संस्थांनी सदर महोत्सवाचे आयोजन केले आहे. सदर महोत्सवाचे उद्घाटन सकाळी ठीक ९-३० वाजता मा.सागर घनश्याम नाईक (झोनल मॅनेजर रत्नागिरी झोन – बँक ऑफ महाराष्ट्र) यांचे शुभहस्ते आणि मा. सिलंंबु अरुमुगम (शाखाधिकारी- बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा आचरे) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. ‘मालवण कथामाला’ अंतर्गत शाळेतील इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतची मुले यात सहभागी होणार असून वर्गवार, शाळास्तर यातून यशस्वी झालेले यशवंत स्पर्धक यात सहभागी होणार आहेत.

इयत्ता तिसरी व चौथीसाठी ‘श्यामची आई’ या पुस्तकातील कथा, इयत्ता पाचवी व सहावीसाठी ‘एक समाज सुधारक’ या विषयावर कथा तर इयत्ता सातवी व आठवी या गटासाठी ‘संस्कार कथा’ असे विषय असून प्रथम क्रमांक ५०० रुपये, द्वितीय क्रमांक ३००रुपये व तृतीय क्रमांक २०० रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. या सोबतच इतरही पुरस्कार व आकर्षक प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. आपल्या कथानिवेदक स्पर्धक विद्यार्थ्यांची नावे बुधवार दिनांक २ ऑक्टोबर २०२४ पूर्वी स्पर्धा संयोजक समितीकडे देण्यात यावीत, असे आवाहन सुगंधा केदार गुरव (दूरभाष ९४२००७८५१९) यांनी केले आहे. पारितोषिके वितरण २० ऑक्टोबर २०२४ रोजी मा. प्रकाश पेडणेकर (सल्लागार समिती सदस्य कथामाला) यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. सदानंद कांबळी (सल्लागार समिती सदस्य कथामाला मालवण ) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा