पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे यांच्या हस्ते लोकार्पण
कुडाळ :
कुडाळ रेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा उद्या बुधवार दिनांक ४ रोजी दुपारी १२ वाजता खासदार नारायण राणे व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे, विधानसभा परिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्ह्या अध्यक्ष प्रभाकर सावंत आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कुडाळ भाजपा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दादा साईल यांनी केले आहे.