सिंधुदुर्गनगरी
धान खरेदी हंगाम सन २०२०-२१साठी एक लाख बारदाणे पुरण्याबाबत जिल्हा बँकेचे अध्यश सतिश सावंत यांनी मुंबईत सहकार मंत्री मा. ना.श्री. बाळासाहेब पाटील यांची भेट घेउन एका लेखी निवेदना द्वारे मागणी केली असता ना बाळासाहेब पाटील यांनी सतिश सावंत यांची मागणी मान्य करत जिल्हा मार्केटींग फेडरेशनला एक लाख बारदाणे पुरवण्याच्या तात्काळ सूचना दिल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत जिल्ह्यात भात खरेदी या शासनाच्या योजने अंतर्गत चालू वर्षी जिल्हायात भात खरेदी केली जाणार आहे.त्यामुळे शेतक-यांनी खाजगी भात विक्री करू नये असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन सतिश सावंत यांनी यापूर्वीच केले आहे. शासन दरवर्षी किमान आधारभूत किंमत जाहीर करते व त्याद्वारे जिल्हा व तालूका खरेदी विक्री संघामार्फत भाताची खरेदी केली जाते.गेल्या दोन तीन वर्षामध्ये शासनाकडून चांगला हमी भाव मिळत असल्याने व संकरीत बियाणांमुळे जिल्ह्यातील उत्पादनात वाढ होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजना चालू आहे. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी ४९धान खरेदी केंद्रे मंजूर केली आहेत.त्यापैकी ३७ केंद्रावर धान खरेदी चालू आहे.३७ धान खरेदी केंद्रावर नवीन बारदाणे ५९५०० व दुबार वापरलेली ३९९७५ अशी एकुण ९९४७५ बारदाणांचे वाटप खरेदी केंद्रावर केलेले आहे.प्रत्यशात १०००० क्विंटल धान खरेदी करण्यात आलेली आहे.त्यासाठी २५०००बारदाणांचा वापर झालेला आहे.उर्वरीत बारदाणें केंद्रावर शिल्लक दिसत आहेत.पुढील धान खरेदी साठी १००००० बारदाणांची मागणी दि.३०/१२/२०२९ रोजी करण्यात आलेली आहे.तसेच वाटप केलेल्या बारदाणांमधून ऑन लाईन खरेदी पोर्टलवर पूर्ण घेण्यात आलेली नाही.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा मार्केटींग फेडरेशनला १००००० बारदाणांची आवश्यकता आहे.तरी सिंधुदुर्ग जिल्हा मार्केटींग फेडरेशनल धान खरेदीसाठी १००००० बारदाणे पुरवण्या बाबत संबधीतांना सुचना द्याव्यात अशी निवेदना द्वारे मागणी सतिश सावंत यांनी सहकारमंत्री यांच्याकडेकेली.सदर मागणी तात्काळ मान्य करत मंत्र्यांनी संबधीतांना तात्काळ सुचना दिल्या. भात खरेदीसाठी जवळपास १.५०लाख बारदानांची गरज असुन पालकमंत्री यानी मार्केटिंग फेडरेशन यांना बारदाने उपलब्द करून देण्या बाबत सुचना दिलेल्या आहेत..एका गावात /ठिकाणी १० मे. टन भात उपलब्द झाल्यास कंपनी थेट गाडी पाठवून माल घेणार आहे.१शेतकरी ५मे.टन पर्यंत भात खरेदी विक्री करू शकतो.त्यासाठी ७/१२ उतारा आवश्यक आहो.भात खरेदी होण्यासाठी पालकमंत्र्यांनी सविस्तर आढावा यापूर्वीच घेतलेला असुन भात खरेदी सुरू होईल. शेतक-यांनी आपले उत्पादित भाताची कमी किंमतीत खाजगी विक्री करू नये असे आवाहन बँकेचे चेअरमन सतिश सावंत यांनी केले आहे.