You are currently viewing मुक्ताई ॲकेडमीच्या बुदधिबळ स्पर्धेला विदयार्थ्यांचा मोठा प्रतिसाद!

मुक्ताई ॲकेडमीच्या बुदधिबळ स्पर्धेला विदयार्थ्यांचा मोठा प्रतिसाद!

सावंतवाडी :

मुक्ताई ॲकेडमीने विदयार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत विदयार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.राणी पार्वती देवी शाळेच्या सभागृहात घेण्यात आलेल्या बुदधिबळ स्पर्धेचे उदघाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.विकासभाई सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी ज.ल.शिर्सेकर शिक्षण संस्थेच्या श्रीमती अनुपमा शेटगे, श्री.बी.आर.नंदीहळ्ळी सर, मुख्याध्यापक श्री.जगदीश धोंड, श्री.संतोष वैज सर, ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर, उपाध्यक्षा सौ.स्नेहा पेडणेकर,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्ष श्री.विकासभाई सावंत मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले, “विदयार्थ्यांनी अभ्यास नियमित करावा.त्याचबरोबर रोज बुदधिबळ खेळावे.यामुळे एकाग्रता वाढते.अशा स्पर्धांमधून राष्ट्रीय स्तरापर्यंत जाता येते.त्याचा उपयोग पुढील प्रगतीसाठी होतो.”इतर मान्यवरांनी विदयार्थ्यांना शुभेच्छा देताना मुक्ताई ॲकेडमी विदयार्थ्यांसाठी घेत असलेल्या स्पर्धा आणि उपक्रमांचे कौतुक केले.मान्यवरांनी बोर्डवर चाल खेळून स्पर्धेचे उदघाटन केले.

स्पर्धेत पहीली ते काॅलेज मधील 72 विदयार्थ्यांनी सहभाग घेतला.श्री.कौस्तुभ पेडणेकर यांनी ॲकेडमी गेली दहा वर्षे विदयार्थ्यांसाठी बुदधिबळ, कॅरम, टेबल टेनिस या खेळांत आणि नृत्य, अभिनय, इत्यादी उपक्रमांत करत असलेल्या स्पर्धा, शिबीर यांचा आढावा घेतला.सौ.स्नेहा पेडणेकर यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा